Advertisement

भारत-चीन तणावाचा झॉमेटोला फटका

भारतातील अनेक कंपन्या ज्यामध्ये चिनी गुंतवणूकदार आहेत, त्या कंपन्यांनाही मोठा फटका सहन करावा लागला. यामध्ये झोमॅटो या कंपनीच्या देखील नावाचा समावेश आहे.

भारत-चीन तणावाचा झॉमेटोला फटका
SHARES

भारत-चीन तणावादरम्यान ५९ चिनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. परिणामी भारतातील अनेक कंपन्या ज्यामध्ये चिनी गुंतवणूकदार आहेत, त्या कंपन्यांनाही मोठा फटका सहन करावा लागला. यामध्ये झोमॅटो या कंपनीच्या देखील नावाचा समावेश आहे.  

चीननं झॉमेटो या कंपनीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. पण भारत-चीन तणावाचा झोमॅटोला १०० दशलक्ष डॉलरचा फटका बसला आहे. जानेवारी ही गुंतवणूक १५० मिलिअन डॉलर म्हणजेच १०६५ कोटींपर्यंत पोहोचली होती. वर्ष २०१८ मध्ये ‘अलिबाबा’शी संबंधित असलेल्या ‘अँट फायनान्शियल’ या आस्थापनानं ‘झोमॅटो’मध्ये मोठी गुंतवणूक केल्याचे वृत्त समोर आलं होतं.


टिक टॉक आणि शॉक ...!


स्विगी, झोमॅटो, बिग बास्केट, बायजू, फ्लिपकार्ट, हाईक, पॉलिसी बाजार यांसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये चीनची मोठी गुंतवणूक आहे. एप्रिलमध्ये भारतीय सरकारानं परदेशी गुंतवणुकीसाठी पूर्व परवानगी घेण्यास सांगितलं होतं. यामध्ये भारताशी सीमेवर संलग्न असलेल्या देशांचा समावेश आहे. opportunistic takeovers रोखण्यासाठी कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर ही घोषणा केली होती.

चीन, बांगलादेश, पाकिस्तान, भूतान, नेपाळ, म्यानमार आणि अफगाणिस्तान हे ते देश आहेत. यामध्ये भारतातील एखाद्या कंपनीत सध्याच्या किंवा भविष्यातील (FDI) मालकीच्या कोणत्याही हस्तांतरणासाठी सरकारी मान्यता अनिवार्य असेल, असंही यात म्हटलं आहे.हेही वाचा

इन्कम टॅक्स भरण्याची तारीख पुन्हा वाढवली, 'ही' आहे शेवटची तारीख

आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर ३१ जुलैपर्यंत बंदी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा