Advertisement

मुंबईत आता हॉटेल चालवा छोट्या जागेत


मुंबईत आता हॉटेल चालवा छोट्या जागेत
SHARES

मुंबईतील छोटी उपहारगृहे तसेच हॉटेल्सची जागा कमी असल्याने अनेकदा त्यांचे स्वयंपाकघर अर्थात किचन छोट्या जागेत बनवले जायचे. पण महापालिकेच्या नियमानुसार या उपहारगृह आणि हॉटेल्समध्ये किचनसाठी १५० चौ. फुटाची जागा नसल्यास त्यांना परवाना नाकारला जायचा. परंतु, आता किचनसाठी १५० फुटाची जागा ठेवण्याची गरजच नसून ही बंधनकारक असलेली अटच महापालिकेने रद्द केली आहे. त्यामुळे आता मुंबईत ३०० चौ. फुटापेक्षा कमी जागेतही आता उपहारगृह तथा हॉटेल उघडता येणार आहे.


३०० चौ. फुटाची जागा हॉटेलसाठी होती बंधनकारक

महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात उपहारगृह चालू करायचे असल्यास त्यासाठी किमान ३०० चौ. फू. आकाराची जागा असणे बंधनकारक आहे. या जागेपैकी किमान १५० चौ. फू. एवढी जागा स्वयंपाकघरासाठी वापरली जाणे यापूर्वीच्या अटींनुसार बंधनकारक होते.


अग्निशमन दलाचे प्रमाणपत्र बंधनकारकच

मुंबईत व्यवसाय सुरू करणे आणि व्यवसाय चालवणे या विषयीच्या गरजा लक्षात घेऊन महापालिका आपल्या संबंधित कार्यपद्धतीत सातत्याने सुधारणा आणि प्रक्रियांचे सुलभीकरण करत आहे. याअंतर्गत आता उपहारगृहांमधील स्वयंपाक घरांसाठी असणारी किमान १५० चौरस फुटांची अट शिथिल करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली आहे. मात्र, उपहारगृहांसाठी आवश्यक असणारे मुंबई अग्निशमन दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र पूर्वीप्रमाणेच बंधनकारक असेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.


हॉटेलची उंची ९ फुटांचीच राहणार

मात्र आता उपहारगृहांचे वैविध्य तसेच त्यानुसार असणारी स्वयंपाकघराची गरज लक्षात घेऊन उपहारगृहातील स्वयंपाक घरांसाठी असणारी १५० चौरस फुटांची अट रद्द करण्यात आली आहे. तसेच उपहारगृहांच्या उंचीबाबत असणारी किमान ९ फुटांची अट पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आली आहे. या सुधारणेमुळे उपहारगृहांमध्ये ग्राहकांना अधिक जागा उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



हेही वाचा - 

'पंजाबी तडका' हॉटेलला अनधिकृत बांधकामाचा फटका, म्हाडाची कारवाई

विक्रोळी स्थानकाशेजारील मासे विक्रेत्यांवर रेल्वेची कारवाई


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा