Advertisement

गोरेगाव, अंधेरी, जोगेश्वरीमध्ये 'या' दिवशी पाणीकपात

मेट्रो-२ च्या कामासाठी जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील जलवाहिनी वळवावी लागणार आहे.

गोरेगाव, अंधेरी, जोगेश्वरीमध्ये 'या' दिवशी पाणीकपात
SHARES

मेट्रो-२ च्या कामासाठी जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील जलवाहिनी वळवावी लागणार आहे. त्यामुळे अंधेरी, गोरेगाव आणि जोगेश्वरीतील काही भागांत २२ व २३ सप्टेंबर रोजी पाणीकपात करण्यात येणार आहे. 

१,२०० मिमी व्यासाची जलवाहिनी वळवण्याचं काम २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून २३ सप्टेंबर रोजी पहाटे ४.३० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. यामुळे या कालावधीत ‘के पश्चिम’, ‘के पूर्व’ व ‘पी दक्षिण’ या तीन विभागांतील काही परिसरांमध्ये पाणीकपात करण्यात येणार आहे.


पाणीपुरवठय़ाच्या वेळेतही तात्पुरता बदल करण्यात येणार आहे. या परिसरांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, असं मुंबई महापालिकेने सांगितलं आहे.


हेही वाचा -

लोकल ट्रेन सुरू झालीच पाहिजे! विरार स्थानकात प्रवाशांचा उद्रेक

सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास अशक्यच, आर्थिक खर्चाच चढता क्रम कायमRead this story in हिंदी or English
संबंधित विषय