अखेर सुनील शितपच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई

Ghatkopar
अखेर सुनील शितपच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई
अखेर सुनील शितपच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई
अखेर सुनील शितपच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई
See all
मुंबई  -  

घाटकोपर साई सिद्धी इमारतीच्या दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या शिवसेनेचा स्थानिक पदाधिकारी सुनील शितप याच्या अनधिकृत बांधकामांविरोधात पालिकेने धडक मोहीम हाती घेतली. अंधेरी घाटकोपर विस्तारित लिंक रोडवर केटरर्सचे सामान ठेवण्यासाठी बांधण्यात आलेल्या मंडपावर शुक्रवारी सकाळी पालिकेने कारवाई करत ते जमीनदोस्त केले.

महापालिका एन विभागाच्या सहायक आयुक्त भाग्यश्री कापसे यांच्या नेतृत्वाखाली सुनील शितपच्या सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

साई सिद्धी इमारतीमधील नर्सिंग होमच्या नुतनीकरणाचे काम सुरू असताना तळ मजल्यावर मुख्य खांबाला धक्का पोहोचवल्यामुळे ही चार मजली इमारत जमीनदोस्त झाली. या दुर्घटनेत 17 जणांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेला नर्सिंग होमचा मालक सुनील शितप जबाबदार असल्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे.


अनधिकृत बांधकामांचा पोलखोल

महापालिका सभागृहात मनसेचे नगरसेवक दिलीप लांडे यांच्यासह भाजपाच्या नगरसेवकांनी शितपच्या अनधिकृत बांधकामांबाबत आवाज उठवला होता. पवईपासून घाटकोपरच्या श्रेयस सिनेमापर्यंत शितप याने अनधिकृत बांधकामे केल्याचा आरोप झाला होता. याची गंभीर दखल महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी घेतली आहे. त्यामुळे शितप याची अनधिकृत बांधकाम शोध मोहीम पालिकेच्या घाटकोपर एन विभागाने घेतली आहे. 

शितप याचे अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवर अनधिकृत बांधकाम होते. ज्याचा वापर केटरर्ससाठी होत असल्याची माहिती समोर आल्यानंतर ते बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. येथे ठेवण्यात आलेली केटरर्सची भांडी आणि अन्य वस्तू रस्त्यावर फेकून देत बुलडोझरच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.हेही वाचा -

अतिरिक्त आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची महापालिका सभागृहाची मागणी

'डिस्चार्ज घेऊन आम्ही जायचं कुठे?' घाटकोपर इमारत दुर्घटनाग्रस्तांचा सवाल


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.