मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रात भाजी विकण्यास मनाई

राज्यातील एकून कोरोना रुग्णांपैकी निम्मे रूग्ण मुंबईत आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रात भाजी विकण्यास मनाई
SHARES

राज्यातील एकून कोरोना रुग्णांपैकी निम्मे रूग्ण मुंबईत आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नागरिकांकडून लॉकडाऊनचं उल्लंघन होत आहेत. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पालिकेने प्रतिबंधित क्षेत्रात भाजी विकण्यास मनाई केली आहे.

मुंबईत ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येतात अशा परिसराला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. या भागातून नागरिकांना घराबाहेर पडण्यास आणि बाहेरील नागरिकांना आत येण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. मात्र, नागरिक भाजी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी करत असल्याचं दिसून आलं आहे. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे आता पालिकेने या प्रतिबंधित क्षेत्रात भाजी विकण्यास मनाई केली आहे. सध्या मुंबईत 241 प्रतिबंधित क्षेत्र आहेत.

मुंबईत नवे 100 रुग्ण आढळून आले असून यातील 55 जण प्रतिबंधित क्षेत्रातील आहेत. मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 590 वर पोहोचली आहे. देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी प्रामाणिकपणे लॉकडाऊनचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे.


हेही वाचा -

संपूर्ण धारावी केली सील, 2 नवे रूग्ण आढळले

भाभा रुग्णालयातील कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू

वरळीकरांना कोरोना करतोय टार्गेट

परळच्या बेस्ट वसाहतीतील ६० कुटुंबांचं विलगीकरण

संबंधित विषय