Advertisement

बाजार गल्ली सुधारली! 'मुंबई लाईव्ह'चा दणका


बाजार गल्ली सुधारली! 'मुंबई लाईव्ह'चा दणका
SHARES

कालपर्यंत ज्या ठिकाणी अत्यावश्यक सेवा देखील पोहचत नव्हती, आज तिथे 'मुंबई लाइव्ह'च्या बातमीनंतर सुधार पाहायला मिळत आहे.

मुंबईच्या डोंगरी विभागातील नवरोजी हिल मार्ग येथे बाजार गल्ली आहे. या विभागातील रस्ता चिंचोळा आहे. त्यातच वाहने कशीही पार्क केलेली असतात. या शिवाय फुटपाथवर दुकान थाटणारे फेरीवाले रस्त्याचा काही भागही अडवतात. त्यामुळे येथे पालिकेच्या कचऱ्याच्या गाडीला येण्यासाठी जागाच उरत नव्हती. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचे चित्र होते. त्याला कंटाळून इथल्या स्थानिक युवकांनी यावर मात करण्याचे ठरवून अॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट (एएलएम) ची सुरुवात केली. त्याला 'अससोसिएशन फॉर द इंटिग्रेशन अॅण्ड मॅनेजमेन्ट ऑफ सोसायटी' (एम्स एएलएम) असे नाव दिले.


आज नवरोजी हिल मार्ग येथे पावसाळ्यातच अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. फेरीवाल्यांचे वाढते प्रमाण आणि नागरिकांमध्ये सामाजिक जागरुकता नसल्यानेच या विभागात ही गंभीर परिस्थिती उद्भवली आहे.

साबीर हुसेन पुंजानी, उपाध्यक्ष, एम्स एएलएम

साबीर हुसेन यांच्या आई झीनत अफझल 59 वर्षांच्या आहेत. त्यांना किडनीचा त्रास असल्याने उपचारासाठी वेळोवेळी रुग्णालयात न्यायचे असते. पण रस्त्यावर केलेली पार्किंग आणि फेरीवाल्यांचे अतिक्रमण यामुळे रुग्णालयात वेळेवर पोहोचता येत नाही.

'मुंबई लाइव्ह'च्या टीमने 19 जुलै रोजी ही गंभीर बाब पालिकेच्या बी वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर याची दखल घेत 1 आठवड्याच्या आत पालिकेने नवरोजी हिल येथील बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे.



हेही वाचा -

याला फुटपाथ म्हणायचं का?

वाकोल्यातील फेरीवाल्यांवर अखेर कारवाई


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा