Advertisement

मुंबईत १० नव्हे, तर २५-३० टक्के पाणीकपात! नगरसेवकांचा महापालिकेत राडा

महापालिकेनं १५ नोव्हेंबरपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. या पाणीकपातीमुळं मुंबईकरांवर पाणी संकट ओढावलं आहे. महापालिकेनं कागदावर १० टक्के पाणीकपात लागू केली आहे, प्रत्यक्षात २५ ते ३० टक्के पाणीकपात करत असून काही भागांमध्ये तर ही कपात ५० टक्क्यांच्या घरात गेल्याचा आरोप सामंत यांनी केला आहे.

मुंबईत १० नव्हे, तर २५-३० टक्के पाणीकपात! नगरसेवकांचा महापालिकेत राडा
SHARES

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये २० ते २५ टक्के पाणीसाठी कमी असल्यानं महापालिकेने मुंबईत १५ नोव्हेंबरपासून १० टक्के पाणीकपात सुरू केली आहे. प्रत्यक्षात मात्र ही कपात १० टक्के नव्हे, तर २५ ते ३० टक्के इतकी होत असल्याने मुंबईकरांना मोठ्या पाणी टंचाईला सामोरं जावं लागत असल्याचं म्हणत सर्वपक्षीय नगरसेवक बुधवारी स्थायी समितीत आक्रमक झाले.


आंदोलन तीव्र करणार

भाजपाचे नगरसेवक अभिजीत सामंत यांच्यासह अन्य नगरसेवकांनी स्थायी समितीत ठिय्या मांडला. मात्र प्रशासनानं या प्रश्नावर बैठकीचं आश्वासन दिल्यानंतर नगरसेवकांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. आठवड्याभरात पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर सर्वपक्षीय नगरसेवक आंदोलन आणखी तीव्र करतील, असा इशारा प्रशासनाला दिल्याची माहिती सामंत यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली आहे.


'इतकं' पाणी आवश्यक

१४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर पाणीची आवश्यकता मुंबईला दरवर्षी असते. इतका पाणीसाठा असेल तरच मुंबईला वर्षभर सुरळीत पाणी पुरवठा होऊ शकतो. असं असताना नोव्हेंबरमध्ये मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ११ लाख दशलक्ष इतकाच पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ९२ टक्के पाणीसाठा शिल्लक होता तिथं यंदा मात्र ७६ टक्के पाणीसाठा आहे.


५० टक्के पाणीकपात

त्यामुळं महापालिकेनं १५ नोव्हेंबरपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. या पाणीकपातीमुळं मुंबईकरांवर पाणी संकट ओढावलं आहे. महापालिकेनं कागदावर १० टक्के पाणीकपात लागू केली आहे, प्रत्यक्षात २५ ते ३० टक्के पाणीकपात करत असून काही भागांमध्ये तर ही कपात ५० टक्क्यांच्या घरात गेल्याचा आरोप सामंत यांनी केला आहे.


म्हणून ठिय्या आंदोलन

अपुऱ्या आणि अव्यस्थित पाणीपुरवठ्यामुळे अंधेरीसह अन्य परिसरामधील नागरिकांना पाणीसंकटाला सामोर जावं लागत आहे. नागरिकांच्या या तक्रारी लक्षात घेता २ दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाला पत्र लिहित हा प्रश्न निकाली काढा अन्यथा स्थायी समितीत ठिय्या मांडू, असा इशारा मी दिला होता. पण प्रशासनानं या प्रश्नी काहीही हालचाल न करता स्थायी समितीत केवळ वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपल्यासह अन्य नगरसेवकांनी स्थायी समिती न सोडण्याचा निर्णय घेत तिथंच ठिय्या मांडल्याचं सामंत यांनी सांगितलं आहे.


विभागांमध्ये बैठका

पाणी, पाणी, पाणी असं करत बराच वेळ स्थायी समितीत सर्वपक्षीय नगरसेवकांचा गोंधळ सुरू होता. पण शेवटी प्रशासनानं या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष देऊ, तात्काळ विविध विभागांमध्ये बैठका लावू, असं आश्वासन दिल्यानंतर नगरसेवकांनी आपलं आंदोलन तूर्तास मागे घेतलं आहे. पण पुढील स्थायी समितीपर्यंत हा प्रश्न निकाली न लागल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामंत यांनी दिला आहे.हेही वाचा-

मुंबईत अनधिकृत बांधकामांचं पेव! ३२ महिन्यांत ७६,४९१ तक्रारी

मुंबईकरांवर पाणीसंकट, आजपासून १० टक्के पाणीकपातRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा