Advertisement

इकडं आड तिकडं विहिर, झाडांच्या मुद्द्यावरून महापालिका अधिकारी हवालदिल

मेट्रो सिनेमाजवळील पिंपळाच्या झाडाची फांदी पडून दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे या झाड पडून झालेल्या दुघर्टनेप्रकरणी चौकशी करण्यात येत असून यामध्ये झाडांच्या फांद्यांची छाटणी योग्यप्रकारे न झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणी या विभागाचे कनिष्ट उद्यान अधिकारी व सहायक उद्यान अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत.

इकडं आड तिकडं विहिर, झाडांच्या मुद्द्यावरून महापालिका अधिकारी हवालदिल
SHARES

मुंबईत झाडांच्या मुद्यावरूनच वातावरण चांगलंच तापलेलं आहे. एका बाजूला झाडांच्या फांद्या छाटल्या नाहीत म्हणून फांदी पडून झालेल्या दुघर्टनेप्रकरणी सहायक उद्यान अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची प्रक्रीया सुरु आहे. तर दुसरीकडे झाडांच्या फांद्या छाटण्यास जाणाऱ्या अधिकाऱ्यांनाच तक्रारदार आणि वृक्षप्रेमींकडून दमदाटी केली जात आहे. त्यामुळे झाडं कापण्यांच्या मुदद्यावरून अधिकारीच आता हवालदिल झाले असून करावं तरी काय? असा सवाल त्यांच्याकडून विचारला जात आहे.


कारवाईचे आदेश

मेट्रो सिनेमाजवळील पिंपळाच्या झाडाची फांदी पडून दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे या झाड पडून झालेल्या दुघर्टनेप्रकरणी चौकशी करण्यात येत असून यामध्ये झाडांच्या फांद्यांची छाटणी योग्यप्रकारे न झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणी या विभागाचे कनिष्ट उद्यान अधिकारी व सहायक उद्यान अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत.



रहिवाशांचा विरोध

मात्र, दुसरीकडे शिवाजीपार्क पोलिस ठाण्याच्या गल्लीतील झाड उन्मळून पडून श्रेया राऊत ही मुलगी गंभीर जखमी झाली होती. परंतु या भागातील झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यास गेलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि कामगारांना पळवून लावण्यात आलं. याप्रकरणी तक्रार आणि वृक्षप्रेमींकडून तसंच महापालिकेकडून एकमेकांविरोधात पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला.

परंतु श्रेया राऊत गंभीर जखमी झाल्यानंतर येथील सर्व झाडांची खोड ठेवून उर्वरीत अर्धे झाड चक्क कापून टाकले जात आहे. त्यामुळे याविरोधात शिवाजी पार्कमधील रहिवाशांनी पुन्हा उठाव करत ही झाडे कापण्यास विरोध दर्शवला.


चुकीच्या धोरणांचा फटका

महापालिकेच्या चुकीच्या धोरणामुळे मुंबईत झाडांच्या फांद्यांची छाटणी करताना प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागतं. झाडांच्या फांद्यांची छाटणी करताना ती कोणत्या आणि कशाप्रकारे केली जावी, याचं ठोस प्रमाण नसल्यामुळेच एकप्रकारे झाडांची कत्तलच केली जात आहे. झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करण्याऐवजी चक्क सर्वच फांद्या तोडून केवळ झाडांचा बुंधाच ठेवला जात आहे. त्यामुळे वृक्षप्रेमींकडून या झाडांच्या कत्तलीचा तीव्र विरोध केला जात आहे.


अधिकाऱ्यांचा काय दोष?

एका बाजूला जनतेच्या विरोधामुळे झाडांच्या फांद्यांची छाटणी करता येत नाही, तर दुसऱ्या बाजूला फाडाची फांदी पडून दुघर्टना झाल्यास उद्यान अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरलं जात असेल तर काम करायचं कसं? असा सवाल महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. ज्या तक्रारदार आणि वृक्षीप्रेमींमुळे झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी होत नाही, त्याला अधिकारी जबाबदार कसे? असा सवालही अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.


वरिष्ठांना पत्र

त्यामुळे अशा तक्रारदार व वृक्षप्रेमींवरही कारवाई करण्याची मागणी होत आहे. या वाढत्या तक्रारींमुळे झाडांच्या फांद्या तोडता येत नसल्याने महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना पत्र सादर करून जर असे प्रकार होत राहिले तर भविष्यात होणाऱ्या दुघर्टनांना आम्ही जबाबदार राहणार नाही, असं स्पष्ट कळवलं आहे.



हेही वाचा-

Exclusive : झाडांची कत्तल करायला लाज वाटायला हवी - सयाजी शिंदे

मेट्रो-३ घेणार आणखी ७६ झाडांचा बळी!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा