Advertisement

पालिका लवकरच ७५ डायलिसिस मशीन खरेदी करेल

मशिन खरेदीसाठी महापालिकेनं निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

पालिका लवकरच ७५ डायलिसिस मशीन खरेदी करेल
(Representational Image)
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) पश्चिम उपनगरातील प्रशासकिय दवाखाने तसंच प्रसूती गृहांसाठी ७५ डायलिसिस मशीन खरेदी करेल, असं अहवालात नमूद केलं आहे. मशिन खरेदीसाठी महापालिकेनं निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

माहितीनुसार, शहराच्या पश्चिमेकडील भागात डायलिसिस केंद्राच्या मागणीत वाढ झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

प्रशासकिय संस्थेच्या अधिकार्‍यांनुसार, अंधेरी (प.), कांदिवली (प), गोरेगाव (पू) आणि घाटकोपर (पू) सारख्या भागांमध्ये मशीन लावले जाणे अपेक्षित आहे.

इंडियन एक्स्प्रेसला पालिकेच्या एका अधिकाऱ्यानं माहिती दिली की, मशिन बसवल्यानंतर खाजगी वैद्यकीय रुग्णालयांमध्ये डायलसिसचा उपचार अनेकांना परवडत नाहीत. पण इथं परवडणाऱ्या किमतीत डायलिसिस करता येईल.

याव्यतिरिक्त, सध्या मोठ्या संख्येनं नगरसेवक उपनगरातील आरोग्य पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. येत्या निवडणुकिच्या पार्श्वभूमीवर प्रभागात अनेक कामं केली जात आहेत. यातून वर्षानुवर्षे लोकसंख्येतील वाढ लक्षात घेतली जाऊ शकते.

लोकसंख्येत वाढ होत असल्यानं अधिक सोई-सुविधांची गरज भासत आहे. त्यामुळे येत्या निवडणुका पाहता नगरसेवक देखील आरोग्य सोई सुविधा देण्याकडे भर देत आहेत.हेही वाचा

ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये आढळतात 'ही' लक्षणं

लस ओमिक्रॉन व्हेरिएंटवर किती प्रभावी?, आरोग्य मंत्रालयाची माहिती

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा