Advertisement

कमला मिलच्या मालकांना अखेर जामीन

न्या. व्ही. एल. आचलिया यांनी बुधवारी रात्री ८.२० वाजता प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि दोन आठवड्यात २ लाख रुपये अस्थायी स्वरूपात जमा करण्यास सांगून हा जामीन मंजूर केला. सोबतच गोवानी आणि भंडारी या दोघांना आपला पासपोर्ट न्यायालयात जमा करण्याचे आणि परदेशी जाण्यास मनाईचे आदेश देण्यात आले आहेत.

कमला मिलच्या मालकांना अखेर जामीन
SHARES

कमला मिल आग प्रकरणी अटकेत असलेले कमला मिल कंपाऊंडचे मालक रमेश गोवानी आणि संचालक रवी भंडारी यांना बुधवारी अखेर उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला.

न्या. व्ही. एल. आचलिया यांनी बुधवारी रात्री ८.२० वाजता प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि दोन आठवड्यात २ लाख रुपये अस्थायी स्वरूपात जमा करण्यास सांगून हा जामीन मंजूर केला. सोबतच गोवानी आणि भंडारी या दोघांना आपला पासपोर्ट न्यायालयात जमा करण्याचे आणि परदेशी जाण्यास मनाईचे आदेश देण्यात आले आहेत. दोघांनाही महिन्यातून एकदा ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे.


कधी झाली होती अटक?

कमला मिल कंपाऊंडमध्ये २९ डिसेंबर रोजी लागलेल्या आग प्रकरणात ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी एमआरटीपी कायद्यांर्तगत गोवानी आणि भंडारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या दोघांना जानेवारी महिन्यात अटक करण्यात आली होती. या दोघांवर एमआरटीपी कायद्याचं उल्लंघन करणं, अनधिकृत बांधकामास मदत करणं, आगीत सापडलेल्यांच्या १४ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणं अशी कलम लावण्यात आली आहेत.


मालकांचं म्हणणं काय?

दरम्यान गोवानी आणि भंडारी या दोघांनी आपल्या या घटनेशी काहीही संबंध नाही, ही घटना घडली तेव्हा आपण तिथं नव्हतो, तिथल्या दैनंदिन कामकाजाशी आपला काहीही संबंध नाही, आग लागली होती त्या जागा आपण भाड्याने दिल्या होत्या, त्या जागेवर पब्ज-रेस्टाॅरंटसाठी महापालिकेनं परवानगी दिली होती, मद्यसेवनाचा परवाना राज्य सरकारनं दिला होता, अग्निसुरक्षाचा परवाना अग्निशमन दलाकडून देण्यात आला होता असं म्हणत जामीनासाठी न्यायालयाकडं अर्ज केला होता.


नातेवाईकांचा जोरदार विरोध

विशेष सरकारी वकील आणि दुर्घटनेतील पीडितांच्या नातेवाईकांनी मात्र या दोघांना जामीन देण्यास जोरदार विरोध केला होता. अखेर दोन्हीकडील बाजू एेकून घेत न्यायालयानं बुधवारी गोवानी आणि भंडारी यांनी जामीन मंजूर करत दिलासा दिला.



हेही वाचा-

कमला मिल आग: २ महिन्यांनी पोलिसांकडून आरोपपत्र दाखल

युग तुलीला २० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा