Advertisement

मोदींविरोधात प्रचारासाठी 'बीएसई'च्या इमारतीचा मॉर्फ फोटोचा वापर

सोशल मीडियावरील स्टँडअप कॉमेडीअन कुणाल कामरा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी मुंबईतील फिरोज जीजीभॉय टॉवर्सचा मॉर्फ केलेला फोटो वापरल्यानं 'बॉम्बे स्टॉक एक्सचेंज'नं कुणाल कामराला फटकारलं आहे

मोदींविरोधात प्रचारासाठी 'बीएसई'च्या इमारतीचा मॉर्फ फोटोचा वापर
SHARES

सोशल मीडियावरील स्टँडअप कॉमेडीअन कुणाल कामरा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी मुंबईतील फिरोज जीजीभॉय टॉवर्सचा मॉर्फ केलेला फोटो वापरल्यानं 'बॉम्बे स्टॉक एक्सचेंज'नं कुणाल कामराला सुनावलं आहे. 'बीएसई'च्या इमारतीचा फोटो चुकीच्या पद्धतीनं वापरल्यानं त्याच्याविरोधात कारवाई करणार असल्याचंही 'बॉम्बे स्टॉक एक्सचेंज'नं ट्विटरवरून स्पष्ट केलं आहे.


४ वेगवेगळे फोटो शेअर

स्टँडअप कॉमेडीअन कुणाल कामरा पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात प्रचार करण्यासाठी सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. कुणालनं १४ एप्रिल रोजी ४ वेगवेगळे फोटो शेअर करत केले होते. तसंत ‘हे फोटो म्हणजे मोदींनी दिलेली आश्वासनं,’ अशी टिप्पणी केली होती. त्यानं शेअर केलेल्या ४ फोटोंपैकी एक फोटो बीएसईच्या इमारतीचा होता. त्यामुळं बीएसई'च्या इमारतीचा फोटो वापरल्यानं, यावर आक्षेप घेत बीएसईनं ट्विट केलं आहे. 



फोटो वापरणं बेकायदेशीर

‘एका राजकीय पक्षाविरोधात बीएसई इमारतीचा मॉर्फ केलेला फोटो कुणाल कामरानं वापरला आहे. अशा कृतीसाठी इमारतीचा मॉर्फ केलेला फोटो वापरणं बेकायदेशीर आहे. कुणाल कामराविरोधात योग्य ती कारवाई करण्यासाठी बीएसईकडे अधिकार आहेत', असं ट्विट बीएसईनं केलं आहे.



ट्विटला प्रत्युत्तर

'बॉम्बे स्टॉक एक्सचेंज'नं केलेल्या ट्विटला कुणाल कामरानं प्रत्युत्तर दिलं आहे. ‘हा विनोद आहे. विनोदाचा सेन्सेक्स अनेक अंकांनी घसरला आहे. बरं जेलमध्ये वायफाय सुविधा असते का?,’ असं उत्तर कुणालने दिलं आहे.



हेही वाचा -

हार्दिक, राहुलला 'कॉफी' भोवली; लोकपालांकडून २० लाखांचा दंड

ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल वाहतूक ओव्हरहेट वायर तुटल्यानं ठप्प



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा