Advertisement

मोबाइल नंबरशी असं करा 'आधार' लिंक


मोबाइल नंबरशी असं करा 'आधार' लिंक
SHARES

केंद्र सरकारने मोबाइल नंबरला आधार क्रमांकाशी लिंक करण्याची तारीख ३१ डिसेंबरवरून पुढे ढकलून ३१ मार्च २०१८ अशी केली आहे. सोबतच केंद्र सरकार नागरिकांच्या सुविधेसाठी एक क्रमांक उपलब्ध करणार असून त्याद्वारे घरबसल्या मोबाइल नंबर आधार क्रमांकाशी लिंक करता येईल. त्यामुळे ज्या मोबाइलधारकांनी अजूनपर्यंत आपला मोबाइल नंबर आधारशी लिंक केला नाही, अशा मोबाइलधारकांच्या हाती आता त्यासाठी बराच वेळ शिल्लक असणार आहे.

मोबाइल नंबरला आधारशी लिंक करण्यासाठी मोबाइल स्टोअरच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. संपूर्ण प्रोसेस एका 'ओटीपी'च्या माध्यमातून सहजरीत्या होईल. त्यासाठी मोबाइल कंपन्या आपल्या वेबसाईटवर एक अॅप्लिकेशन तयार करतील.


स्‍टेप: १

  • मोबाइल कंपनीने वेबसाईटवर दिलेल्या अॅप्लिकेशनमध्ये मोबाइल नंबर टाकल्यास मोबाइलधारकाला एक 'वन टाइम पासवर्ड' (ओटीपी) मॅसेज येईल. 
  • हा 'ओटीपी' आणि आधार क्रमांक अॅप्लिकेशनमध्ये टाकल्यास मोबाइल नंबर आधारशी लिंक होईल.


स्‍टेप: २

  • दुसऱ्या पद्धतीत मोबाइल कंपनीने वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेल्या अॅप्लिकेशनवर जाऊन मोबाइलधारकाने स्वत:चा नंबर टाकावा लागेल. 
  • त्यानंतर त्यांना 'इंटरअॅक्टीव्ह व्हाईस रिस्पाॅन्स सिस्टीम' (आयव्हीआरएस) चाही पर्याय मिळू शकतो. त्याद्वारेही आधार कार्ड लिंक करता येऊ शकते.


स्‍टेप: ३

  • सोबतच केंद्र सरकारने सर्व मोबाइल कंपन्यांना निर्देशा दिले आहेत की त्यांनी वयस्कर आणि आजारी व्यक्तीला घरी जाऊन ही सेवा दिली पाहिजे. 
  • त्यानुसार कंपनीच्या एजंटद्वारेही मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक करता येऊ शकेल.


सूचना - दोन सिम कार्ड असलेल्या व्यक्तीकडील जो मोबाइल नंबर आधारशी जोडलेला असेल, ओटीपी क्रमांक त्याच नंबरवर येईल. या मॅसेजला रिप्लाय दिल्यास दोन्ही सिम कार्ड आधारशी लिंक होतील.



हेही वाचा -

'बहुत नाइंसाफी है'! आधार नंबर एक, लाभ मात्र शेकडो शेतकऱ्यांना!!

आता आरोग्य कर्मचाऱ्यांचं वेतन आधार कार्डवर होणार!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा