Advertisement

खवळलेल्या समुद्रात चक्कर येऊन पडलेल्या तरुणाला पोलिसांनी वाचवले

खवळलेल्या समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आपटत उडणाऱ्या पाण्याखाली वाल्मिकी खेळत असतानाच, अचानक त्याला चक्कर आली. तो स्वतःला सावरणार इतक्यात तोल जाऊन तो खवळलेल्या समुद्रात पडला.

खवळलेल्या समुद्रात चक्कर येऊन पडलेल्या तरुणाला पोलिसांनी वाचवले
SHARES

गेट-वे (Gateway of india) च्या कट्यावर बसून पावसाचा आनंद घेणाऱ्या व्यक्तीला अचानक चक्कर आल्याने तो समुद्रात पडला. वेळीचही बाब तेथे गस्तीवर असलेल्या पोलिसांना कळाल्यानंतर मोठ्या शर्तीने मुंबई पोलिसांनी त्याचे प्राण वाचवले. पोलिसांच्या या शौर्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर वायरल होत असून नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक केले जात आहे.  

हेही वाचाः- मुंबईत पावसानं मोडला २६ वर्षातला विक्रम

मुसळधार पावसात समुद्र किनारी फेर फटका मारण्यासाठी अनेक जण गर्दी करतात.  मुंबईच्या याच मुसळधार पावसाचा (Heavy rain) आनंद घेत विजय कुंडी वाल्मिकी हा गेट-वे समोरील कट्यावर बसला होता. खवळलेल्या समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आपटत उडणाऱ्या पाण्याखाली वाल्मिकी खेळत असतानाच, अचानक त्याला चक्कर आली. तो स्वतःला सावरणार इतक्यात तोल जाऊन तो खवळलेल्या समुद्रात पडला. मदतीसाठी धडपडणाऱ्या वाल्मिकीकडे गस्तीवर असलेल्या कुलाबा पोलिस (Culaba police) ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक लब्दे, नरोडे, यांची नजर गेली. दोघांनी क्षणाचाही विचार न करता नियंत्रण कक्षाला या घटनेची माहीती देत, कुलाबा मोबाइल गाडीला रोप घेऊन घटनास्थळी पोहचण्याचा मॅसेज दिला. माहिती मिळताच  पोलीस नाईक भांगरे व महिला पोलीस शिपाई कारखीले रोप घेऊन घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचाः- मुंबईची तुंबई करून दाखवली, दरेकरांचा शिवसेनेला टोला

मोठ्या शर्तीने या चौघांनी  खवळलेल्या समुद्रात पडलेल्या वाल्मिकीला बाहेर काढले. वाल्मिकिला तात्काळ उपचारासाठी जवळील रुग्णालयात नेले. त्यानंतर त्याला त्याच्या नातेवाईकांकडे सोपवले. पोलिसांच्या या शौर्याचा व्हिडिओ उपस्थित स्थानिकांनी काढून सोशल मिडियावर टाकला. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत असून नागरिक पोलिसांच्या या शौर्याचे कौतुक करत आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा