बीडीडीतील बायोमेट्रीकचा वाद पुन्हा चिघळणार?

Bandra East
बीडीडीतील बायोमेट्रीकचा वाद पुन्हा चिघळणार?
बीडीडीतील बायोमेट्रीकचा वाद पुन्हा चिघळणार?
See all
मुंबई  -  

नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासांतर्गत 14 जुलैपासून, पुन्हा नव्याने बायोमेट्रीक सर्वेक्षणाला सुरूवात होणार आहे. मात्र मागच्याप्रमाणे हे सर्वेक्षण देखील उधळून लावू, असा इशारा अखिल बीडीडी चाळी सर्व संघटनांच्या एकत्रित संघाचे अध्यक्ष डाॅ. राजू वाघमारे यांनी पुन्हा एकदा दिला आहे.

बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या पात्रता निश्चितीसाठी आणि करारनामा करण्यासाठी बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. याआधी मे महिन्यात म्हाडा आणि उपजिल्हाधिकाऱ्यांकडून बायोमेट्रीक सर्वेक्षणाला सुरूवात झाली. पण बीडीडीतील रहिवाशांनी जोरदार विरोध करत हे सर्वेक्षण पहिल्याच दिवशी उधळून लावले. सर्वेक्षणात बऱ्याच तांत्रिक चुका असल्याने आणि बीडीडीतील रहिवाशांची संमती न घेता, करारनामा न करताच सर्वेक्षण होत असल्याचे म्हणत एकत्रित संघाने हे सर्वेक्षण बंद पाडले.

बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या म्हणण्याप्रमाणे दुसऱ्या घराची अट रद्द करण्यासह इतर तांत्रिक अडचणी दूर केल्याने आता पुन्हा नव्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यानुसार ना.म.जोशी मार्ग आणि नायगावमधील बीडीडी रहिवाशांना 14 जुलैपासून सर्वेक्षणाला सुरूवात करण्यासंबंधीच्या नोटीसा पाठवण्यास सुरूवात केली आहे.

त्यामुळे बायोमेट्रीकवरुन सुरू असलेला वाद आणखी चिघळतो की बायोमेट्रीक सर्वेक्षण यशस्वीपणे होते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.


करारनामा आणि संमतीच्या अटीवर आम्ही ठाम आहोत. परंतु आमच्या मागणीकडे सरकार आणि म्हाडा सातत्याने दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे जोपर्यंत आमच्या अटी मान्य होत नाही, तोपर्यंत सर्वेक्षण होऊ देणार नाही. 14 जुलै रोजी सकाळपासूनच बीडीडीतील रहिवासी रस्त्यावर उतरतील आणि बायोमेट्रीक सर्वेक्षणाला विरोध करतील.
डाॅ. राजू वाघमारे, अध्यक्ष, अखिल बीडीडी चाळी सर्व संघटना एकत्रित संघदुसऱ्या घराची अट रद्द करण्यासह 1996 च्या पुराव्याची अट रद्द केली आहे. त्यामुळे अामचा बायोमेट्रीक सर्वेक्षणाला विरोध नाही. लवकरात लवकर पुनर्विकास व्हावा अशीच आमची इच्छा आहे.
कृष्णकांत नलगे, सरचिटणीस, बीडीडी चाळ उपक्रम सेवा समितीहे देखील वाचा -

बीडीडी चाळीत म्हाडाची बॅनरबाजी!डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.