Advertisement

कुपरेज दुघर्टनाप्रकरणी उद्यान विभागाचे अधिकारी, कंत्राटदार अडकणार!


कुपरेज दुघर्टनाप्रकरणी उद्यान विभागाचे अधिकारी, कंत्राटदार अडकणार!
SHARES

कूपरेज उद्यानात घोड्यावरुन रपेट मारताना सहा वर्षीय मुलीचा पडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर उद्यानातील बकालस्थिती आणि अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा याबाबत नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने आपला अहवाल महापालिका आयुक्तांना सादर केला आहे. या अहवालामध्ये उद्यान विभागाचे अधिकारी, विभाग कार्यालयातील देखभाल करणारे अधिकारी, तसंच कंत्राटदार या सर्वांवर ठपका ठेवण्यात आला आहे. या सर्वांची जबाबदारी निश्चित केल्यामुळे ही संबंधित मंडळी यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


अहवाल आयुक्तांना सादर

कूपरेज उद्यानात घोड्यावरून रपेट मारताना ६ वर्षीय मुलीचा पडून मृत्यू झाला. विशेष म्हणजे २०१५पासून मुंबईत घोडेस्वारीला बंदी घालण्यात आली होती. तरीही कूपरेज उद्यानात घोड्यांची रपेट होते. याशिवाय या उद्यानाची योग्य प्रकारे देखभालही केली जात नव्हती. येथील पायवाटेवरील लाद्याही उखडल्या होत्या. त्यामुळे या सर्व बाबींची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांची चौकशी समितीनेमण्यात आली होती. या चौकशी समितीनं अहवाल महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना सादर केला.



दोषी कोण?

अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी आपण अहवाल आयुक्तांना दिल्याचं महापालिका सभागृहात सर्व नगरसेवकांना सांगताना 'जे जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार' असल्याचंही आश्वासन दिलं. मात्र, यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अहवालामध्ये उद्यान विभागाचे संबंधित अधिकारी, विभाग कार्यालयातील देखभाल विभागातील उद्यान खात्याचे अधिकारी, तसेच संबंधित कंत्राटदार यांना प्राथमिक दोषी ठरवण्यात आलं आहे.


बंदीनंतरही घोड्यांना प्रवेश

कूपरेज उद्यानाच्या देखभालीबाबतच्या, तसंच घोड्यांना बंदीनंतरही प्रवेश दिल्याबद्दल या सर्वांवर ठपका ठेवण्यात आला आहे. या सर्वांना दोषी ठरवण्यात आल्यामुळे आता महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मान्यतेनंतर त्यांच्यावरील दोष निश्चित करण्यात येणार आहेत. त्यानंतर या सर्वांची खात्यांतर्गत चौकशी केली जाण्याची शक्यता महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.



हेही वाचा

महापालिकेच्या नगरसेवकांना उद्यान, मैदानांची चिंता किती?


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा