Advertisement

धारावीतील कोरोनाबाधितांची संख्या हजाराच्या जवळ

धारावीत सोमवारी ५७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, त्यामुळं एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एक हजाराच्या जवळ पोहोचली आहे.

धारावीतील कोरोनाबाधितांची संख्या हजाराच्या जवळ
SHARES

मुंबईत कोरोना व्हायरसचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते आहे. धारावीत सोमवारी ५७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, त्यामुळं एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एक हजाराच्या जवळ पोहोचली आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत दररोज वाढणारी रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरली आहे. काही दिवसांपूर्वी दररोज २५ पर्यंत सापडणारे रुग्ण आता ५०च्याही पुढे जाऊन पोहोचले आहेत.

सोमवारी दिवसभरात धारावीत ५७ नवीन रुग्ण सापडले. त्यामुळे येथील रुग्णसंख्या ९१६ वर पोहचली आहे, तर २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धारावीतील चोगले चाळ, धारावी मेन रोड, ९० फूट रोड, अबू बकर चाळ, धारावी क्रॉस रोड, धोबी घाट, न्यू म्युनिसिपल चाळ, माटुंगा लेबर कॅम्प, गौतम चाळ, मुस्लिम नगर, शास्त्री नगर, सुबोध चाळ, पीएमजीपी कॉलनी, नेहरू चाळ, ढोरवाडा, कुट्टीवाडी, प्रणय अपार्टमेंट, तुळजाबाई चाळ, ट्रान्झिट कॅम्प, सोशल नगर, इंदिरा नगर, अण्णा नगर, कुंटे नगर, होळी मैदान, सकिनाबाई चाळ, महात्मा गांधी सोसायटी, अशोक मिल कंपाऊंड, मिराज कंपाऊंड, शेरवाडी, सिद्धार्थ चाळ, शिवशक्ती नगर, डॉ. बालिगा नगर येथे हे करोनाबाधित आढळले.

धारावी पठोपाठ दादर व माहीम परिसरातही कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दादर परिसरात सोमवारी ५ नवीन रुग्ण सापडले असून तेथे कोरोनाबाधितांची एकूण संख्या ११४ झाली आहे. तसंच, एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे. न. चिं. केळकर रोड, गोखले रोड परिसरात हे रुग्ण आढळले आहेत. त्याशिवाय, माहीम परिसरात १८ नवीन रुग्ण सापडल्याने येथील रुग्णसंख्या १३७ झाली आहे. तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे. नया नगर, माहीम पोलिस कॉलनी या भागांत नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.



हेही वाचा -

मुंबई लोकल सुरू करु द्या, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती

मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कामाची आयुक्तांनी केली पाहणी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा