Advertisement

मुंबईसाठी पहिल्यांदाच एवढं पाणी!


मुंबईसाठी पहिल्यांदाच एवढं पाणी!
SHARES

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणक्षेत्रांमध्ये सध्या पावसाने चांगलाच जोर धरलेला असून यामुळे पाण्याच्या साठ्यात तब्बल 85 टक्के एवढी लक्षणीय वाढ झाली आहे. अवघ्या दोन महिन्यांत तलावातील पाणीसाठा 85 टक्क्यांवर पोहचल्यामुळे मागील अनेक वर्षांच्या इतिहासात प्रथमच जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात एवढा उच्चांक पाणीसाठ्याने गाठलेला पाहायला मिळत आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी आदी धरणांमधून दरदिवशी 3370 दशलक्ष लिटर्स पाण्याचा पुरवठा केला जातो. या सर्व धरणांमध्ये वर्षाला 14 लाख 47 हजार 263 दशलक्ष लीटर्स एवढा पाण्याचा साठा आवश्य असतो. त्या तुलनेत यासर्व धरणांमध्ये 12 लाख 32 हजार 678 दशलक्ष लिटर्स एवढा पाण्याचासाठा जमा झालेला आहे. मागील पाच ते सात वर्षांतील हा सर्वाधिक पाणीसाठा मानला जात आहे.

आशेचा पाऊस

आतापर्यंत मोडकसागर, तानसा हे दोन धरणे भरून वाहू लागली आहेत. त्यापाठोपाठ आता तुळशी आणि अप्पर वैतरणा ही दोन धरणेही काटोकाट भरत आली असून पावसाचा असाच जोर राहिल्यास येत्या दोन-चार दिवसांमध्ये ही धरणे भरली गेल्याचे वृत्त मुंबईकरांना ऐकायला मिळू शकेल, असा विश्वास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मते जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत 85 टक्के पाणीसाठा जमा होणे ही मोठी बाब आहे. आजवरच्या इतिहासात एवढ्या कालावधीपर्यंत 85 टक्के पाणीसाठा जमा झाला नव्हता. त्यामुळे जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात जमा झालेला हा पाणीसाठा ऐतिहासिक मानला जावू शकतो, असे महापालिकेच्या वरिष्ठ जल अभियंत्यांचे म्हणणे आहे. उपायुक्त (जलअभियंता) रमेश बांबळे यांना विचारले असता, त्यांनीही जुलैपर्यंत जमा झालेला हा पाणीसाठा जास्त असल्याचे सांगितले. सन 2010 पासून एवढा पाणीसाठा जमा झालेला नाही. टक्केवारीपेक्षा पाणीसाठा अधिक आहे, हे नक्की. यापूर्वी मध्य वैतरणा धरण नव्हते. त्यामुळे पूर्वीच्या साठ्यावर टक्केवारी काढली जायची. 12 लाख 32 हजार लिटर पाणीसाठा हा आजवरच्या साठ्यापेक्षा अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.


24 जुलैपर्यंतचा पाणीसाठा

वर्षपाणीसाठी
2015
4 लाख 96 हजार 896 दशलक्ष लीटर्स (34.33 टक्के)
2016
8 लाख 66 हजार 448 दशलक्ष लीटर्स (59.86 टक्के)
2017
12 लाख 32 हजार 678 दशलक्ष लीटर्स (85.15 टक्के)


 


 हेही वाचा -

पाण्याची चिंता नको! मोडकसागर पाठोपाठ तानसाही भरले!

पाणीकपात कटाप



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा