Advertisement

शौचालयाच्या टाकीच्या स्फोटात ५ जण जखमी

सायन (Sion) इथं शौचालयाच्या (Toilet) टाकीच्या झालेल्या स्फोटात ५ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

शौचालयाच्या टाकीच्या स्फोटात ५ जण जखमी
SHARES

मुंबईतील सायन (Sion) इथं शौचालयाच्या (Toilet) टाकीच्या झालेल्या स्फोटात ५ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सायन एलबीएस रोड (Sion L.S.B. Road) शिव मंदिर इथं सकाळी ८.३० वाजता सार्वजनिक शौचालयाच्या (Public Toilet) टाकीचा अचानक स्फोट झाला. यामध्ये स्फोटानंतर शौचालयाचा काही भाग कोसळला.

या दुर्घटनेत ५ जण जखमी झाले. चंद्रशेखर जैयस्वाल (२८), मोहम्मद शेख (२९), हमीद खान, कमलेश जैयस्वाल, पलचंद्रा चौबे हे पाच जण जखमी झाले. जखमींना तातडीने शीव रुग्णालयात (Sion Hospital) दाखल करण्यात आले. यामध्ये एकाची प्रकृती चिंताजनक असून, इतर ४ जणांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती महापालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून (Municipal Emergency Department) देण्यात आली.

हेही वाचा - मुंबईकरांवर आणखी वीजदरवाढ नको, राज ठाकरेंचं विद्युत नियामक आयोगाला पत्र

सायन इथं म्हाडानं (MHADA) आमदार निधीतून (MLA Fund) हे शौचालय (Toilet) बांधलं होतं. या शौचालयाची देखभाल योग्य पद्धतीनं होत नसल्यामुळं सेफ्टिक टँकमध्ये विषारी वायू साठून त्याचा स्फोट झाला. झोपडपट्ट्यांमध्ये मलनिस्सारण वाहिन्यांची सुविधा नसल्यामंळे शौचालयांच्या बाहेर सेफ्टिक टँक बसविण्यात येतात.

हेही वाचा - फडणवीसांनी कोट्यावधी रुपये जाहिरातीवर उधळले

दुर्घटनाग्रस्त झालेले हे शौचालयाचं बांधकाम म्हाडाकडून करण्यात आलं होतं. काही वर्षांपूर्वीच म्हाडानं बांधलेली शौचालयं महापालिकेकडं हस्तांतरित करण्यात आली आहेत. मात्र, हे शौचालय हस्तांतरित करण्यात आलेलं नव्हतं. परंतु, आता महापालिकेनं रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेत हे शौचालय ताब्यात घेऊन त्याची दुरुस्ती करणं शक्य झाल्यास हे शौचालय दुरूस्त केलं जाणार आहे.हेही वाचा -

५५५ रुपयांचं तिकीट ५ हजार ५०० रुपयांना, प्रवाशाची फसवणूक

अखेर 'त्या' जलवाहिनीच्या दुरूस्तीचं काम पुर्णRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा