Advertisement

भिकारी, विक्रेतांसाठी जैन मंदिराचा पुढाकार, ओळखपत्रांशिवाय दिली लस

मंदिर विश्वस्थांनी भिकारी आणि रस्त्यावरील विक्रेतांच्या लसीकरणाची जबाबदारी उचलली आहे.

भिकारी, विक्रेतांसाठी जैन मंदिराचा पुढाकार, ओळखपत्रांशिवाय दिली लस
SHARES

मुंबईतील (Mumbai) एका जैन मंदिरानं नुकतंच मंदिरात लसीकरण मोहीम राबवण्याचा ठरवलं होतं. त्यानुसार मंदिरात लसीकरणाची (Vaccination) सोय केली गेली आहे. यासोबतच मंदिर विश्वस्थांनी भिकारी आणि रस्त्यावरील विक्रेतांच्या लसीकरणाची जबाबदारी उचलली आहे.

लसीकरण प्रभारी जे शाह म्हणाले की, हा उपक्रम मानवतावादी आहे. साथीच्या आजारापासून स्वत:चा बचाव करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लस आहे. ज्यांना याबद्दल काहीच माहिती नाही अशा लोकांचा टीका करणं ही अधिक महत्त्वाची बाब आहे.

"डॉक्टरांच्या मदतीनं आम्ही आमच्या मोहिमेच्या दुसऱ्या सहामाहीत तयार केलेल्या एका विशेष सत्राखाली त्यांना लसी दिल्या जात आहेत. आम्ही त्यांना लसी देण्यापूर्वी सल्ला देतो कारण त्यांच्यातील बहुतेकांना कोरोनाच्या साथीबद्दल माहिती देखील नाही,” असं शहांनी एएनआयला सांगितलं.

या उपक्रमाची लाभार्थी आणि घराघरात काम करणारी अल्कानं सांगितलं की, "लस घेण्यासाठी माझ्याकडे कोणताही ओळख पुरावा नाही. मला या लसीची माहिती होती आणि माझा डोस घेण्याची उत्सुकता होती, परंतु ओळखपत्र नसल्यानं मला लस घेता येत नव्हती."

आणखी एक लाभार्थी आशा म्हणाली की, तिला साथीच्या रोगाची माहिती असूनही तिला लसबद्दल काहीच माहिती नव्हती. आपल्याकडे ओळखपत्र नसल्याचंही तिनं नमूद केलं. आमच्यासारख्यांसाठी पुढाकार घेतल्याबद्दल तिनं जैन मंदिर विश्वस्थांचे आभार मानले.हेही वाचा

नवजात बाळांसाठी बीएमसी आयात करणार इंटेंसिव्ह केअर व्हेंटिलेटर्स

कांदिवलीतील ‘त्या’ संशयास्पद लसीकरण प्रकरणाची होणार सखोल चौकशी

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा