Advertisement

आयआयटी बॉम्बेच्या परिसरात बिबट्याचा वावर


आयआयटी बॉम्बेच्या परिसरात बिबट्याचा वावर
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्षणमंत्र्यांनी शाळा, कॉलेज, बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं मुंबईतील आयआयटी बॉम्बेही बंद ठेवण्यात आलं आहे. परंतु, आयआयटी बॉम्बे बंद असताना या काळात परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला आहे.

हेही वाचा - 24 तासात कोरोना बाधित पोलिसांची संख्या 'इतकी' वाढली, तर 27 जणांचा मृत्यू

आयआयटी बॉम्बेच्या एका सुरक्षा रक्षकाला हा बिबट्या दिसला असून, त्याने त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता, बिबट्या जंगलाच्या झाडीत पुन्हा पळून गेल्याची माहिती सुरक्षारक्षकानं दिली. या आधीही आयआयटी बॉम्बेच्या परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला होता. त्यामुळं सध्या अनेक विद्यार्थी आयआयटी संकुलात नसले तरी असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

मुंबईच्या आयआयटी संकुलात मोकाट बैल आणि गायींचा वावर वाढला आहे. याआधी काही महिन्यांपूर्वी  का विद्यार्थ्याला एका वळूनं जोरदार धडक दिल्यानं विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी आयआयटी परिसरात वाढलेल्या जनावरांच्या वावराबाबत प्रशासनानं संकुलातील गायींची काहीतरी व्यवस्था करावी अशी तक्रार केली होती. 

हेही वाचा - आता केस कापण्यासाठी खिशाला लागणार कात्री

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांकडून संस्थेच्या परिसरातील सुरक्षारक्षक, कर्मचाऱ्यांना मास्क देण्यात आले. या मास्कसाठी रोजच्या वापरातील घरातील वस्तूंचा वापर करण्यात आला होता. आयआयटी बॉम्बेच्या इंडस्ट्रियल स्कूल ऑफ डिझाइन विभागातील (आयडीसी) प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी मास्क तयार केले होते.



हेही वाचा -

दिलासादायक: वरळी कोळीवाड्यातील 'इतके' टक्केभाग प्रतिबंधित क्षेत्राच्या यादीतून मुक्त

रिलायन्स समूहातील 'आलोक इंडस्ट्रीज' बनवणार स्वस्तातले पीपीई किट्स



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा