Advertisement

मुंबईकरांनो आतातरी सावध व्हा! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगानं शहरी आणि ग्रामीण भागाकरीता संचारबंदीचे आदेश दिले आहेत.

मुंबईकरांनो आतातरी सावध व्हा! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन
SHARES

कोरोना प्रादुर्भावामुळे यवतमाळ जिल्ह्यातील बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगानं शहरी आणि ग्रामीण भागाकरीता संचारबंदीचे आदेश दिले आहेत.

रविवारी अमरावती जिल्हात लॉकडाऊन पाळला जाणार आहे. शनिवारी सायंकाळी रात्री ८ वाजल्यापासून हा लॉकडाऊन सुरू होणार असून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाउन रहाणार आहे.

रविवारी जिल्ह्यात कडकडीत बंद राहणार असून केवळ अत्यावश्यक सेवा राहतील सुरू राहतील, अशी माहितीही अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे.

  • शहरी आणि ग्रामीण भागामध्ये ५ किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी तसंच जमावानं एकत्र जमू नये.
  • सर्व प्रकारच्या वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसम्मेलने, सामुहिक कार्यक्रम, सभा, बैठका ई. करीता केवळ ५० व्यक्तींना उपस्थित राहता येईल.
  • तसंच मिरवणूक आणि रॅली काढण्यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात येत आहे.
  • २० पेक्षा जास्त व्यक्ती अंत्यविधी प्रसंगी एकत्र येणार नाही आणि सामाजिक अंतराचे पालन करावं लागेल.
  • हॉटेल, पानटपरी, चहाची टपरी, चौपाटी इत्यादी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा, हॅन्ड सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळणं बंधनकारक राहील. या ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असल्याचं आढळून आल्यास स्थानिक प्रशासनानं नियंत्रण ठेवण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
  • जिल्ह्यातील सर्व धार्मिक संस्था, प्रार्थना स्थळे यांनी त्यांचे संस्थान, मस्जिद, मंदीर, चर्च आणि इतर धार्मिक संस्थानामध्ये, कार्यक्रमामध्ये गर्दी होणार नाही, या दृष्टीनं आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.
  • नागरीकांची गर्दी जिल्ह्यातील सर्व दुकानांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये होणार नाही, याबाबत स्थानिक प्रशासन (नगरपरिषद/नगर पंचायत/ग्रमापंचायत) यांनी दक्षता घ्यावी. सर्व दुकानं, बाजारपेठ रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहतील याबाबत दक्षता घ्यावी.
  • जिल्ह्यातील इयत्ता ५ ते ९ पर्यंत सुरू असलेल्या फक्त नगर परिषद आणि नगर पंचायत क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये, सर्व प्रकारची खाजगी शैक्षणिक संस्था, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस २८ फेब्रुवारी २०२१ च्या मध्यरात्रीपर्यंत बंद राहतील.
  • सकाळी ८ ते रात्री ९.३० वाजेपर्यंतरेस्टारंट, हॉटेल सुरु ठेवण्यात मुभा देण्यात येत आहे. तसंच होम डिलेव्हरी करण्याकरीता रात्री ११.३० वाजेपर्यंत मुभा राहील. रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये दोन टेबलच्यामध्ये सामायिक अंतर (6 फुट) राखणं बंधनकारक राहील.



हेही वाचा

राज्यात कोरोना रुग्णवाढ चिंताजनक, साडेपाच हजार नव्या रुग्णांची नोंद

क्वारंटाईन व्यक्ती फिरताना आढळल्यास एफआयआर, बीएमसीचा निर्णय

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा