Advertisement

राज्यात आचारसंहिता भंगाच्या १ हजार ८०० तक्रारी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यातच आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्याचा इशारा निवडणूक आयोगानं दिला होता.

राज्यात आचारसंहिता भंगाच्या १ हजार ८०० तक्रारी
SHARES

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यातच आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्याचा इशारा निवडणूक आयोगानं दिला होता. त्यानंतर आतापर्यंत राज्यात आचारसंहिता भंगाच्या १ हजार ८६२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारींनंतर यावर जिल्हास्तरावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. 


७५ कोटींचा मुद्देमाल जप्त

राज्यभरात दाखल करण्यात आलेल्या तक्रारींमध्ये मतदारांना आमिषापोटी सोनं, मद्य, अंमली पदार्थांचा वापर केल्याचं समोर आलं आहे. तसंच या तक्रारींनुसार मद्य, सोनं, अमली पदार्थ आणि रोख रक्कम मिळून ७५.७९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. निवडणुका निर्भय आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडाव्या यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. 

तसंच पोलीस, आयकर, अबकारी विभागामार्फत निगराणी ठेवण्यात येत आहे. आतापर्यंत १९.८२ कोटी रुपये रोख, ३८.३६ कोटींचं सोन्याचे दागिने, १३.६४ कोटी रुपयांचं मद्य आणि ३.९६ कोटींचे अंमली पदार्थ असा ७५.७९ कोटींचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड यांनी दिली.




हेही वाचा -

खा. संजय राऊत अडचणीत, निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

शेतकऱ्यांसाठी 'स्वतंत्र अर्थसंकल्प', काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा