Advertisement

राज्यातील जनतेला मोठं गिफ्ट, वीजदरात ७ ते ८ टक्क्यांची कपात!

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगा (Maharashtra Electricity Regulatory Commission) ने महाराष्ट्रातील विजेच्या दरात सरासरी ७ ते ८ टक्क्यांची कपात सुचवली आहे. ही वीजदर कपात (Electricity rate cut) पुढील ५ वर्षांसाठी लागू असणार आहे.

राज्यातील जनतेला मोठं गिफ्ट, वीजदरात ७ ते ८ टक्क्यांची कपात!
SHARES

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगा (Maharashtra Electricity Regulatory Commission) ने महाराष्ट्रातील विजेच्या दरात सरासरी ७ ते ८ टक्क्यांची कपात सुचवली आहे. ही वीजदर कपात (Electricity rate cut) पुढील ५ वर्षांसाठी लागू असणार आहे. लाॅकडाऊनमुळे दिवसभर घरात बसून विजेचा वापर करणाऱ्या राज्यभरातील वीज ग्राहकांना (Electricity users) या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगा (MERC) चे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. १ एप्रिलपासून नवी वीजदर (electricity tariff ) कपात लागू होणार आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग लवकरच याबाबतचे आदेश जारी करणार आहेत. या निर्णयामुळे घरगुती, औद्योगिक आणि शेती कामासाठी वीज वापरणाऱ्या वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

आर्थिक विकासाला चालना

विविध संवर्गासाठीच्या वीजदरात पुढील ५ वर्षांसाठी सरासरी ७ ते ८ टक्के कपातीची सूचना एमईआरसीकडून राज्यातील वीज कंपन्यांना करण्यात आली आहे. गेल्या १०-१५ वर्षांनंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची दर कपात राज्यात होणार आहे. यामुळे सध्याच्या परिस्थितीत आर्थिक विकासाला चालना मिळण्यास प्रोत्साहन मिळेल, असे एमईआरसीचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी सांगितलं. 

हेही वाचा - ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींचं ६० टक्के वेतन कापणार

इतके कमी होतील वीजदर

आयोगाच्या निर्णयानुसार, मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी उद्योगासाठीचे वीज दर १० ते १२ टक्क्यांनी कमी होणार असून घरगुती वीजदर ५ ते ७ टक्क्यांनी कमी होणार आहेत तर शेतीसाठीचे वीज दर १ टक्क्यांनी कमी होणार आहेत.

मुंबईत बेस्टचे उद्योगासाठीचे वीज दर ७ ते ८ टक्क्यांनी, तर व्यवसायासाठीचे वीज दर ८ ते ९ टक्क्यांनी आणि घरगुती विजेचे दर १ ते २ टक्क्यांनी कमी होतील. मुंबई उपनगरात वीज पुरवठा करणाऱ्या टाटा आणि अदानी या कंपनीच्या उद्योगासाठीच्या विजेच्या दरांत १८ ते २० टक्क्यांनी तर व्यवसायासाठी विजेच्या दरांत १९ ते २० टक्क्यांची कपात होईल. तर घरगुती वापराच्या विजेच्या दरांत १० ते ११ टक्क्यांनी कपात होणार आहेत.

वीज गरजेपुरतीच वापरा

अत्यंत तपशीलवार अभ्यास करून तसंच प्रदीर्घ चर्चा करून हे वीजदर ठरवण्यात आले आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे शासनाच्या तिजाेरीवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. वीज वितरण कंपन्या व्यावसायिक पद्धतीने वीज वितरण करत ग्राहकांना कमी दरांमध्ये वीज पुरवण्यास सक्षम आहेत. परंतु वीज दरात कपात झाली, म्हणून ग्राहकांनी विजेचा अनावश्यक वापर न करता गरजेपुरता वापर करावा, असं आवाहन कुलकर्णी यांनी केलं आहे.

हेही वाचा- राज्यात मोठं आर्थिक संकट, ताबडतोब २५ हजार कोटींचं पॅकेज द्या- अजित पवार


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा