Advertisement

ट्रायमॅक्स मशिन्स बंद, छापील तिकिटेही अपुरी, बेस्ट पुढे कशी चालणार?


ट्रायमॅक्स मशिन्स बंद, छापील तिकिटेही अपुरी, बेस्ट पुढे कशी चालणार?
SHARES

बेस्ट प्रवाशांना तिकीट देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रायमॅक्स तिकीट मशिन्स नादुरुस्त होण्याच्या प्रकारात वाढ झाली असून त्यामुळे पुन्हा छापील तिकीट देण्याची वेळ बस वाहकांवर आली आहे. पण आता छापील तिकीटांचा साठाच केवळ 20 दिवस पुरेल इतका असल्यामुळे बेस्टची तिकिटे कशी फाडली जाणार? असा प्रश्न उभा आहे.

बेस्ट प्रवाशांना बस तिकिटे देण्यासाठी सन 2010 मध्ये ट्रायमॅक्स कंपनीच्या मशिन्स घेण्यात आल्या. बेस्टच्या सर्व आगारांमध्ये सुमारे 8 हजार मशिन्सचा वापर केला जात आहे. यापैकी अनेक मशिन्स मागील महिन्यापासून बंद पडत आहेत. पण या बंद मशिन्स त्वरित दुरुस्त केल्या जात नाहीत. याबाबत बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत ट्राय मॅक्स कंपनीच्या प्रतिनिधींनी केवळ 30 ते 40 मशिन्सच बंद असल्याची खोटी माहिती दिली.


600 ते 700 मशिन्स बंद

भाजपाचे सुनील गणाचार्य यांनी मात्र प्रतीक्षा नगर, सांताक्रूझ, आणिक आणि वरळी या चारच आगारांमध्ये सुमारे 600 ते 700 मशिन्स बंद असल्याचे सांगितले. मागील 20 दिवसांपासून या मशिन्स बंद पडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असून मशिन्स नसल्यामुळे कागदी छापील तिकिटे दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या बेस्टकडे 20 दिवस पुरेल इतकीच छपील तिकिटे आहेत. यात एक रुपया, दोन रुपये आणि पाच रुपये अशा प्रकारची ही तिकिटे आहेत. त्यामुळे आठ रुपयांचे तिकीट असल्यास वाहकाला 3 तिकिटे द्यावी लागतात. त्यामुळे तिकीट देण्याबरोबर त्यांचा हिशोब ठेवताना वाहकाची(कंडक्टर) दमछाक होते.


डेली तिकिटावर परिणाम

बेस्टच्या वतीने शहरात संपूर्ण दिवसासाठी 30 रुपये आणि उपनगरासाठी 40 रुपये असे तिकीट आहे. सकाळी 11 ते 5 या वेळेत हे तिकीट घेतले जाते. परंतु मशिन्स नादुरुस्त असल्यामुळे या दैनंदिन पासधारकांना बसमधून खाली उतरवून ज्या बसमध्ये मशिन्स आहेत, तिथे चढा असे सांगण्यात येत असल्याचे गणाचार्य यांनी सांगितले.



हेही वाचा -

मिनी एसी बसचा प्रस्ताव फेटाळला

बेस्ट कर्मचाऱ्यांचीही होणार बायोमेट्रिक हजेरी


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा