Advertisement

मालाड, गोरेगावातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा, पालकमंत्र्यांचे निर्देश

वाहन चालवताना वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून त्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण होत आहे.

मालाड, गोरेगावातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा, पालकमंत्र्यांचे निर्देश
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील गोरेगाव, मालाड-मालवणी भागातील पी उत्तर व पी दक्षिण क्षेत्रातील वाहतूक खोळंबणाऱ्या चौक, रस्त्यांची कामे तातडीने सुरू करावीत. तसंच जिथं रस्त्यांची गरज आहे, त्या ठिकाणी नवीन रस्त्यांची कामे सुरू करण्याचे निर्देश वस्त्रोद्योग, बंदरे, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिले. (mumbai guardian minister aslam sheikh directs bmc to complete road repairing work in malad and goregaon)

सध्या पावसामुळे रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. लिंक रोड, वीर सावरकर मार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग,आरे काॅलनी इ ठिकाणच्या रस्त्यांवर लहानमोठे असंख्य खड्डे पडले आहेत. यामुळे वाहन चालवताना वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून त्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण होत आहे. या खड्ड्यांमध्ये पडून दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. वाहनचालकांना जागोजागी वाहतूककोंडीचा सामना देखील करावा लागत आहे. यामुळे रहिवाशांकडून हे रस्ते त्वरीत दुरूस्त करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने होत आहे.

हेही वाचा- अंधेरीतील खड्ड्यांना तलावांची नावं, फोटो होतोय व्हायरल

या पार्श्वभूमीवर गोरेगाव व मालाड भागातील रस्त्यांची कामे, रुंदीकरण आदीसंदर्भात मंत्रालयात अस्लम शेख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी महानगरपालिकेचे विजय बल्लमवार, सहायक आयुक्त एस. एस. काबरे, कार्यकारी अभियंता गिरीश निकम, वरिष्ठ वास्तुरचनाकार डी. आर बिडवे, सहायक आयुक्त (रस्ते) एस.पी. आंब्रे, यू. सी. कोरगावकर आदी यावेळी उपस्थित होते.

गोरेगाव, मालाड-मालवणी भागात ज्या ठिकाणी अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा होतो, अशा ठिकाणी रस्ते रुंदीकरणाची कामे सुरू करावीत. मिसिंग लिंक असलेल्या रस्त्यांवरील कामे तसंच आवश्यक तिथं नवीन रस्त्यांच्या कामाचा आराखडा सादर करावा. तसंच या भागातील सरकारी जमिनींवरील अतिक्रमणेही तत्काळ काढण्याच्या सूचना अस्लम शेख यांनी यावेळी दिल्या.

हेही वाचा- खड्ड्यांनी जीव मेटाकुटीला आणलाय, राष्ट्रवादी ‘सेल्फी विथ खड्डा’ का काढत नाही?

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा