Advertisement

येत्या २४ तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबई, ठाणे, पालघर येथेही मंगळवारी आणि बुधवारी मध्यम स्वरूपाच्या, तर गुरुवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

येत्या २४ तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा
SHARES

मुंबईसह राज्यभरात ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासून पावसानं दमदार हजेरी लावली आहे. मुंबईत मागील २ दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळं चाकरमान्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. मुंबईत सोमवारी पावसाची संततधार सुरू राहिली. मंगळवारी देखील मुंबईत ढघाळ वातावरण असून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याशिवाय, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या २४ तासांत अतिमुसळधार पाऊस, तर मराठवाड्यात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे.

मुंबई, ठाणे, पालघर येथेही मंगळवारी आणि बुधवारी मध्यम स्वरूपाच्या, तर गुरुवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, सोमवारी दिवसभर मुंबईत पावसाची संततधार सुरू होती. अधूनमधून काही भागात जोरदार सरी कोसळत होत्या. मात्र कुठेही पाणी तुंबले नाही, शहर भागात एका ठिकाणी झाड कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

नैऋत्य मौसमी वारे सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात सक्रिय आहेत. त्यामुळं या भागात पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. मुंबई, गोव्याच्या डॉपलर रडार प्रतिमा आणि उपग्रह प्रतिमा, कोकण व घाट भागात दाट ढग दर्शवत आहेत. त्यानुसार येत्या २४ तासांत घाट भागात (सातारा, पुणे) अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये, पुणे, सातारा, कोल्हापूर येथील घाट भागांमध्ये गुरुवारपर्यंत ऑरेंज अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. तर रायगडमध्ये बुधवारी पावसाचा जोर थोडा कमी होणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.



हेही वाचा -

Raj Thackeray: मॉल उघडले तर मंदिरं का नाहीत?- राज ठाकरे

केशवजी नाईक चाळीतील गणेशोत्सव यंदा 'असा' होणार साजरा


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा