Advertisement

गुटखा खाणाऱ्यांनो सावधान! पोलिस आहेत तुम्हच्यावर लक्ष ठेवून

तस्करांवर वचक बसवण्यासाठी या पुढे पोलिसांना स्वतंत्र कारवाई करण्याच आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

गुटखा खाणाऱ्यांनो सावधान! पोलिस आहेत तुम्हच्यावर लक्ष ठेवून
SHARES

राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असताना, अनेक तस्कर छुप्या पद्धतीने सुंदधीत सुपारीच्याच्या नावाखाली गुटख्याची तस्करी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या तस्करांवर वचक बसवण्यासाठी या पुढे पोलिसांना स्वतंत्र कारवाई करण्याच आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांनी दिली आहे. पूर्वी कारवाई करण्यापूर्वी अन्न व प्रशासन विभागाची(FDA) ची परवानगी घ्यावी लागत होती.

हेही वाचाः- 'या' वयोगटातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक

गुटखा व तत्सम पदार्थांवर राज्यात विक्रीला बंदी आहे मात्र तरीही अनेक ठिकाणी याची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. अशा प्रकरणात यापूर्वी तक्रार करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांना खाद्य एवं औषध प्रशासन (एफडीए) ची परवानगी घ्यावी लागत होती मात्र आता यापुढे स्वतंत्ररित्या महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) अशा प्रकरणात गुन्हा दाखल करू शकणार आहेत. राज्यात अगोदरपासूनच असणाऱ्या गुटखा बंदी ची अंमलबजावणी अधिक कठोर रित्या करण्यासाठी राज्य सरकारद्वारे ही नवी योजना करण्यात आली आहे. यापुढे पोलीस गुटखा विक्रेते तसेच तस्करी प्रकरणात आढळणाऱ्या व्यक्तींच्या विरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करू शकणार आहेत. पोलीस महानिरीक्षक, मिलिंद भारंबे यांनी यासंदर्भात १६ जुलै रोजी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. तर भविष्यात गुटखा विकणाऱ्यासोबत विकत घेणाराही तितकाच गुन्हेगार ठरवून त्याच्यावर ही कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचाः-क्रिकेट असोसिएशनने थकवले मुंबई पोलिसांचे कोट्यावधी रुपये

काही दिवसांपूर्वी अन्न व प्रशासन विभाग, पोलिसांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत एक बठक पार पडली. या बैठकीत गुटखा (Gutkha) विक्रेत्यांवर भारतीय दंडसंहिता अंतर्गत गुन्हा दाखल केला जावा असे आदेश देण्यात आलेले आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा