Advertisement

देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्यापासून वीजनिर्मिती होणार, स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर

देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रस्तावाला बुधवारी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे देवनारवासीयांना लवकरच मोकळा श्वास घेता येणार आहे.

देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्यापासून वीजनिर्मिती होणार, स्थायी समितीत प्रस्ताव  मंजूर
SHARES

देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रस्तावाला बुधवारी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे देवनारवासीयांना लवकरच मोकळा श्वास घेता येणार आहे. 


देवनार डम्पिंग ग्राऊंडची कचरा साठवणुकीची क्षमता संपलेली आहे. त्यामुळे  हे डम्पिंग ग्राऊंड शास्त्रोक्तपणे बंद केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात या डम्पिंग ग्राऊंडवरील ६०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी चेन्नई एम. एस. डब्ल्यू. प्रा. लि. कंपनीची निवड करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यासाठी ६४८ कोटी रुपये खर्च होणार आहेत. तर पुढील १५ वर्षांच्या देखभालीसाठी ४०० कोटी याप्रमाणे एकूण १,०५६ कोटी रुपयांचे कंत्राट कंपनीला देण्यात येणार आहे. हा प्रस्ताव लाॅकडाउनच्या आधी १६ मार्च रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला भाजपने विरोध केला होता. अखेर या प्रस्तावाला आता मंजुरी मिळाली आहे. 


मुंबईत सध्या दर दिवशी सुमारे साडेहजार मेट्रिक टन कचरा निर्माण होत आहे. यातील साडेपाच हजार मेट्रिक टन कांजुर व दीड हजार मेट्रिक टन कचरा देवनार डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो. न्यायालयाने देवनारमध्ये कचरा टाकणे बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर हे डम्पिंग ग्राऊंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी पालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. 



हेही वाचा -

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ दिवासापासून सुरू होणार सिनेमागृह, नाट्यगृह  Diwali 2020

दिवाळीत जादा भाडे आकारल्यास खासगी वाहतूकदारांवर होणार कारवाई 



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा