Advertisement

रेल्वेतील खाद्यपदार्थांच्या पाकिटावर क्यू आर कोड

रेल्वे प्रशासनानं खाद्यपदार्थांच्या पाकिटावर ‘क्यू आर कोड' लावण्यास सुरुवात केली आहे.

रेल्वेतील खाद्यपदार्थांच्या पाकिटावर क्यू आर कोड
SHARES

रेल्वे स्थानकांवर आणि गाडीत विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांबाबत प्रवासी अनेकदा तक्रार करतात. खाद्यपदार्थात सापडलेल्या हानीकारक गोष्टींमुळं विषबाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळं या सर्व प्रकारातून प्रवाशांची सुटका व्हावी तसंच, प्रवाशांना पदार्थाचा दर्जा कळावा यासाठी रेल्वे प्रशासनानं खाद्यपदार्थांच्या पाकिटावर ‘क्यू आर कोड' लावण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांच्या तक्रारीवर कायमचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

साशंकता व्यक्त

अनेकदा खाद्यपदार्थांचा दर्जा, कधी किंमत तर कधी त्यांच्या वैैधतेविषयी साशंकता व्यक्त केली जाते. त्यामुळं इंडियन रेल्वे टूरिजम अ‍ॅण्ड कॅटरिंग कॉर्पोरेशनच्यामार्फत (आयआरसीटीसी) मुंबई सेंट्रल टर्मिनस येथील प्रमुख स्वयंपाकगृहात 'क्यू आर कोड' सुविधा सुरू करण्यात आली आहे.

सुरक्षित अन्न

नुकताच, सीएसएमटी स्थानकातील प्रमुख स्वयंपाकगृहातील खाद्यपदार्थांच्या पाकिटावर 'क्यू आर कोड' सुरू लावण्यात आली आहेत. या सुविधेद्वारे प्रवाशांना पाकीटबंद पदार्थाचा दर्जा, गुणवत्ता आणि किंमत तपासता येणार आहे. यामुळं प्रवाशांना सुरक्षित अन्न मिळण्यास मदत होणार आहे.हेही वाचा -

गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात, सुदैवाने थोडक्यात बचावले

गणेशोत्सव २०१९: एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला, पगार होणार लवकरRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा