Advertisement

निकृष्ट कोल्डमिक्स महापालिकेचं की कंत्राटदाराचं?

ज्या भागांमध्ये कंत्राटदार नियुक्त करण्यात अालेला नाही, त्या भागांमधील खड्डे बुजवण्यासाठी महापालिका स्वत: बनवलेल्या कोल्डमिक्साचा वापर करत आहे. त्यामुळे असफल ठरणारं खड्डयातलं मटेरियल महापालिकेचं की कंत्राटदाराचं, असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.

निकृष्ट कोल्डमिक्स महापालिकेचं की कंत्राटदाराचं?
SHARES

मुंबईतील खड्डयांवरून रान उठलं असून खड्डे बुजवण्यासाठी येणाऱ्या तंत्रज्ञानावरच शंका उपस्थित होऊ लागली आहे. महापालिकेने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी परिमंडळ निहाय कंत्राटदारांची नेमणूक केली असली, तरी हे कंत्राटदार खड्डे बुजवण्यासाठी कुठलं तंत्रज्ञान वापरतात याची प्रशासनाला कल्पना नाही. त्यातच ज्या भागांमध्ये कंत्राटदार नियुक्त करण्यात अालेला नाही, त्या भागांमधील खड्डे बुजवण्यासाठी महापालिका स्वत: बनवलेल्या कोल्डमिक्साचा वापर करत आहे. त्यामुळे असफल ठरणारं खड्डयातलं मटेरियल महापालिकेचं की कंत्राटदाराचं, असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.


कोल्डमिक्सच्या जागी पेव्हरब्लाॅक

स्थायी समितीच्या सभेत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी खड्डयांच्या बाबतीत हरकतीचा मुद्दा उपस्थित करून खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येणारं कोल्डमिक्स बिनकामाचं ठरल्याचा आरोप केला. कोल्डमिक्स असफल ठरल्यानेच पेव्हरब्लॉकचा वापर केला जात असल्याचं सांगत त्यांनी खड्डे न कोल्डमिक्सने न बुजवता पेव्हरब्लॉकने बुजवून कामचुकारपणा करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी त्यांनी केली. यावर सर्वच सदस्यांची खड्डयांचं पुराण वाचवून दाखवून प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं.


कंत्राटदार काळ्या यादीत

प्रशासनाच्यावतीनं बोलताना अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी कोणत्या विभागाला किती कोल्डमिक्सचा साठा उपलब्ध करून देण्यात आला याची जंत्रीच वाचून दाखवली. प्रत्येक झोनला ३३० ते ३४० कोल्डमिक्स उपलब्ध करून दिलं जातं. ७ परिमंडळांसाठी खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. त्यापैकी परिमंडळ ३ मधील कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे त्यांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.


माहिती नसल्याची कबुली

ज्या भागांमध्ये कंत्राटदार नियुक्त केलेले आहेत, त्या भागातील खड्डे कंत्राटदारामार्फत बुजवले जातात. तर परिमंडळ सहाचं कंत्राट उशिरा दिल्यामुळे आणि परिमंडळ ३ साठीचा प्रस्ताव मागे घेतल्यामुळे या दोन भागांमधील खड्डे हे महापालिकेच्यामाध्यमातून बुजवले जात आहे. नियुक्त केलेल्या कंत्राटदारांना स्वत: च्या अस्फाल्ट प्लांटमधून मटेरियल आणून खड्डा बुजवणं बंधनकारक आहे. परंतु ते कुठल्या आणि कोणत्या प्रकारचं मटेरियल वापरतात याबाबत सध्या आपल्याकडे माहिती नसल्याची कबुली खुद्द विजय सिंघल यांनी दिली.


१२५ कोटी खर्च

महापालिकेच्या अस्फाल्ट प्लांटमधून कोल्डमिक्स निर्माण करण्यासाठी ५ वर्षांसाठी १२५ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. वर्षाला १० हजार मेट्रीक टन कोल्डमिक्स निर्माण करण्याची क्षमता आहे. मात्र २४ विभागातील कार्यकारी अभियंता रस्त्यांवर उतरून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं.



हेही वाचा-

मुंबईतल्या खड्ड्यांवरून केंद्र सरकारची 'सर्वोच्च' कानउघडणी

मुख्यमंत्री म्हणतात, ''मुंबईत फक्त ४ हजार खड्डे''



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा