Advertisement

तानसालगतच्या झोपडपट्टीवासियांची फरफट अखेर थांबली!


तानसालगतच्या झोपडपट्टीवासियांची फरफट अखेर थांबली!
SHARES

तानसा जलवाहिनी येथून कुर्ल्याला स्थलांतरित केलेल्या 400 कुटुंबियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. न्यायालयाने शुक्रवारी या 400 कुटुंबियांना दिलासा देत त्यांना कोहिनूर येथून हलवू नये, असे आदेश दिले आहेत.

ही 400 कुटुंब घाटकोपरच्या तानसा जलवाहिनी लगत असलेल्या झोपड्यांमध्ये राहात होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 29 नोव्हेंबर रोजी इथल्या 400 कुटुंबियांना चाव्या देत त्यांचे स्थलांतर कुर्ला येथील कोहिनूर इमारतीत केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तानसा जलवाहिनी लगतच्या झोपड्यांवर 30 नोव्हेंबर रोजी कारवाई केली. हे रहिवासी नव्या घरात स्थिरावत असताना महापालिकेने 7 महिन्यांतच त्यांना पुन्हा माहुल येथे स्थलांतरीत होण्याची नोटीस पाठवली होती.

त्यामुळे या रहिवाशांनी गुरुवारी कुर्ला येथील कोहिनूर इमारतीपासून ते एन वॉर्ड ऑफिसपर्यंत प्रकाश मेहता यांच्या विरोधात मोर्चा देखील काढला होता. पण मार्ग न निघाल्याने त्यांनी पालिकेच्या या नोटीसविरोधात न्यायालयात धाव घेतल्यानंतर 'त्या कुंटुंबियांना कोहिनूर येथून हलवू नये', असे आदेश देत त्यांना माहुल येथे स्थलांतरीत करण्याचे आदेश न्यायालयाने रद्द केले.


हेही वाचा -

जलवाहिनीलगतच्या बेकायदा झोपड्या वर्षभरात हटवणार

तानसा जलवाहिनीच्या मोकळ्या जागेत जॉगिंग आणि सायकलिंग ट्रॅक


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा