Advertisement

"संजीवनी आपके द्वार" उपक्रमाअंतर्गत ५०० रिक्षाचालकांचे मोफत लसीकरण

नाहूर इथल्या ५०० रिक्षाचालकांना गुरुवारी मोफत लस देण्यात आली. यात महिला रिक्षाचालकांचा देखील समावेश आहे.

"संजीवनी आपके द्वार" उपक्रमाअंतर्गत  ५०० रिक्षाचालकांचे मोफत लसीकरण
SHARES

नाहूर इथल्या ५०० रिक्षाचालकांना (Auto driver) गुरुवारी मोफत लस देण्यात आली. यात महिला रिक्षाचालकांचा देखील समावेश आहे. खासदार मनोज कोटक (Manoj Kotak) यांच्या पुढाकारानं १८-४५ वयोगटातील रिक्षाचालकांसाठी ही लसीकरण मोहीम (Vaccination Drive) राबवण्यात आली होती. यात रिक्षाचालकांना कोविशिल्ड (covishield) लसीचा पहिला डोस देण्यात आला.

विशेष म्हणजे ऑटो चालकही महाराष्ट्र सरकारकडून (State Government) अत्यावश्यक कामगारांच्या श्रेणीचा दर्जा मिळावा अशी मागणी करत आहेत. तथापि, सरकारनं त्यांना अद्याप असा कोणताही दर्जा देण्याचा विचार केलेला नाही. रिक्षावाल्यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ते कुठल्याही अडथळ्याशिवाय प्रवाशांच्या सेवेत आहेत.

एका रिक्षाचालकानं म्हटलं की, आम्ही दररोज अनेकांच्या संपर्कात येतो. त्यामुळे आम्हाला घरी जायलाही भिती वाटते. त्यात लॉकडाऊनमुळे प्रवाशांची संख्या देखील कमी आहे. यामुळे भाडं कमी मिळतं. कमी पैशात घर चालवणंही कठिण झालं आहे.

बहुतेक रिक्षा चालक त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमाई करणारे आहेत. त्यामुळे कोरोनाच्या भितीनं घरी राहिलं तरी कुटुंबाचा खर्च कसा उचलणार? असा प्रश्न त्यांना पडला आहे. दोन वेळच्या जेवणासाठी बाहेर गेलं तर, मग कोरोनाची भीती त्यांच्या मनात घर करून आहे.

अशात पैसे खर्च करून लस घेणं त्यांना परवडण्यासारखं नाही. सरकारी रुग्णालयांमधील मोफत लस मिळवण्यासाठी खूप थांबावं लागत असल्याची खंत अनेर रिक्षा चालकांनी बोलून दाखवली. त्यामुळे असे मोफत लसीकरणाचे उपक्रम आमच्यासारख्या लोकांसाठी फायदेशीर असल्याचं एका रिक्षाचालकानं सांगितलं.

रिक्षाचालकांनी आपली ही समस्या खासदार मनोज कोटक यांच्यापुढे मांडली. मनोज कोटक यांनी त्यांना चांगला प्रतिसादही दिला. याचा परिणाम म्हणून खासदार मनोज कोटक यांच्या वतीनं रिक्षाचालकांच्या या मागणीची दखल घेत ५०० रिक्षाचालकांना आज 'संजीवनी आपके द्वार' अंतर्गत लसीकरण करण्यात आले.

खासदार मनोज कोटक यांनी सुरू केलेल्या "संजीवनी आपके द्वार" अभियानाअंतर्गत निरंतर जनतेची सेवा करणारे आणि बाह्य संपर्कात असलेल्या गरजू लोकांना येत्या काळात ही लस दिली जाईल.

"संजीवनी आपके द्वार" कार्यक्रमांतर्गत पुरुष आणि महिला वाहन चालकांना लसीकरण करण्यात आले. रिक्षा हे मुंबईकरांच्या प्रवासाचे मुख्य साधन आहेत, वाहन चालक लस घेतल्यामुळे त्याचे कुटुंब आणि रिक्षातील प्रवासीही सुरक्षित राहतील, असं मत मनोज कोटक यांनी व्यक्त केलं.



हेही वाचा

भिकारी, विक्रेतांसाठी जैन मंदिराचा पुढाकार, ओळखपत्रांशिवाय दिली लस

कांदिवलीतील ‘त्या’ संशयास्पद लसीकरण प्रकरणाची होणार सखोल चौकशी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा