Advertisement

पालकांवर स्कूल बस फी वाढीची टांगती तलवार

सध्या प्रत्येक टोलनाक्यावर प्रति वाहन ७५ रुपये इतका टोल आकारण्यात येतो. त्यामुळे टोल, इंधन इतर खर्च एकत्रित करून प्रतिमहिना स्कूल बससाठी जवळपास १७ हजार ४०० रुपये इतका खर्च करावा लागतो. त्यातच डिझेल-पेट्रोलच्या दरातही सातत्याने वाढत असल्याने स्कूल बसच्या मालकांना आर्थिक गणित सांभाळणं कठीण जात आहे.

पालकांवर स्कूल बस फी वाढीची टांगती तलवार
SHARES

वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर यासोबतच ठिकठिकाणी भरावे लागणारे टोल यंदा स्कूल बसच्या फी वाढीकरिता कारणीभूत ठरणार आहेत. येत्या काही दिवसांत स्कूल बसला टोलनाक्यांवर सवलत मिळाली नाही, तर स्कूल बस शुल्कात वाढ करण्याचे संकेत 'स्कूल बस ओनर्स असोसिएशन'कडून देण्यात आले आहेत.


किती होतो टोलवर खर्च?

सध्या मुंबई उपनगरातील मुलुंड एलबीएस मार्ग, ऐरोली, दहिसर, आणि वाशी या ४ टोलनाक्यांनर स्कूल बसला दरदिवशी ३ ते ४ वेळा टोल भरावा लागतो. पूर्वी टोलचा दर प्रतिवाहन ६० रुपये टोल आकारणी केली जात होती. परंतु तीन महिन्यापूर्वी सरकारने टोलमध्ये १५ रूपये दरवाढ केली.

त्यामुळे सध्या प्रत्येक टोलनाक्यावर प्रति वाहन ७५ रुपये इतका टोल आकारण्यात येतो. त्यामुळे टोल, इंधन इतर खर्च एकत्रित करून प्रतिमहिना स्कूल बससाठी जवळपास १७ हजार ४०० रुपये इतका खर्च करावा लागतो. त्यातच डिझेल-पेट्रोलच्या दरातही सातत्याने वाढत असल्याने स्कूल बसच्या मालकांना आर्थिक गणित सांभाळणं कठीण जात आहे.


विद्यार्थ्यामागे ४०० ते ५०० रुपयांची वाढ

नुकतीच स्कूल बस ओनर्स असोसिएशनची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत भाडेवाढीच्या प्रस्तावावर चर्चा झाली असून प्रत्येक विद्यार्थीमागे दर महिन्याला ४०० ते ५०० रुपये फी वाढ करण्याचं ठरवण्यात आलं. राज्य सरकारने स्कूल बसला टोलवसुलीतून सवलत दिल्यास ही फी वाढ आम्ही करणार नाही. परंतु सरकारने आमच्या मागणीकडे लक्ष न दिल्यास भाडेवाढ करावीच लागेल, असा पवित्रा या बैठकीत बस चालकांनी घेतला.


पालकांचं बजेट कोलमडणार

पालकांचं आर्थिक गणित कोलमडणार सध्या प्रत्येक विद्यार्थ्याला दर महिन्याला १२०० रुपये स्कूल बस फी आकारण्यात येते. प्रत्येक मुलामागे ४०० ते ५०० रूपये फी वाढ झाली तर पालकांचं आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता आहे.


सध्या एका विद्यार्थ्याकडून स्कूल बसच्या सेवेसाठी महिन्याला १२०० रुपयांपर्यंत फी घेतली जाते. सरकारने शाळा सुरू होण्यापूर्वी स्कूल बसला ४ टोल नाक्यावर सवलत दिली नाही, तर या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शुल्कात वाढ करण्यात येईल. हे टोल रद्द केले, तरच स्कूल बसची फी वाढणार नाही.
- अनिल गर्ग, अध्यक्ष, स्कूल बस ओनर्स असोसिएशन



हेही वाचा-

स्कूल बस चालकाचा पालकावर जीवघेणा हल्ला

मुंबईत अवजड वाहनांना पुन्हा 'नो एण्ट्री'



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा