Advertisement

स्कूल बस असोसिएशनचा काळा दिवस


स्कूल बस असोसिएशनचा काळा दिवस
SHARES

मुंबईसह राज्यभरातील स्कूल बस असोसिएशन गुरुवारी काळा दिवस पाळणार आहेत. हरियाणातल्या रायन स्कूलमधील लहान मुलाच्या हत्येनंतर स्कूल बस चालकांवर अनेक नियम लादले गेले. या मानसिक त्रासाविरोधात गुरुवारी स्कूलबस चालक काळा दिवस पाळणार आहेत. असे असोसिएशनकडून स्पष्ट करण्यात आले आहे. स्कूल बसचालक काळे कपडे घालून, हाताला काळी फित बांधून किंवा बसवर काळा झेंडा लावून निषेध व्यक्त करतील.


स्कूलबस चालकांवर लादलेले नियम

  • शाळेच्या आवारात बंदी
  • शाळेचे स्वछतागृह वापरण्यास बंदी
  • शाळेतील पिण्याचे पाणी पिण्यास बंदी
  • स्कूल बस शाळेच्या आवारात पार्किंग करू नये.


शाळेने आमच्यावर लादलेल्या या नियमांचा आम्हाला त्रास होत आहे. शाळेकडून अतिशय वाईट वागणूक दिली जात आहे. हा काळा दिवस सरकारला जाग येण्यासाठी आम्ही पाळत आहोत. सरकारने लावकरात लवकर याबाबत नियम स्पष्ट करावेत.
- अनिल गर्ग, अध्यक्ष स्कूलबस असोसिएशन


असोसिएशनच्या प्रमुख मागण्या

  • स्कूल बस चलकांसाठी स्वतंत्र स्वछतागृहाची सोय करणे
  • शाळा आणि पालकांनी बस चालकांना चांगली वागणूक देणे
  • शाळेच्या आवारात बससाठी स्वतंत्र पार्किंग जागा देणे

हेही वाचा -

स्कूलबसमध्ये महिला बसवाहक नेमणार

स्कूलबसमधल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा