Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,79,929
Recovered:
45,41,391
Deaths:
77,191
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
40,162
1,717
Maharashtra
5,58,996
40,956

कोरोनाग्रस्तांसाठी पुठ्ठ्याच्या तब्बल ७ हजार खाटा

वापी येथील क्राफ्ट पेपर आणि अन्य तत्सम उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या आर्यन पेपर ग्रुपनं पुठ्ठय़ापासून खाटांची निर्मिती करण्यात आली आहे.

कोरोनाग्रस्तांसाठी पुठ्ठ्याच्या तब्बल ७ हजार खाटा
SHARES

कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्यानं विलगीकरणात जाणाऱ्या नागरिकांवर उपचारासाठी खाटांचा तुटवडा भासू नये, यासाठी पुठ्ठ्याचा वापर करून खाटा बनविण्यात आल्या आहेत. नावीन्यपूर्ण पद्धतीनं पुठ्ठ्यापासून सुमारे ७ हजार खाटा बनवण्यात येत असून त्यापैकी जवळपास ५ हजार खाटा आधीच मुंबईतील अलगीकरण, विलगीकरण केंद्रांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

वापी येथील क्राफ्ट पेपर आणि अन्य तत्सम उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या आर्यन पेपर ग्रुपनं पुठ्ठय़ापासून खाटांची निर्मिती करण्यात आली आहे. करोना विरुद्धच्या लढाईत योगदान देण्याच्या उद्देशानं कंपनीनं या खाटांची निर्मिती केली असून नौदल, मुंबई महापालिका आणि अन्य काही संस्थांना मिळून पुठ्ठ्याच्या १ हजार खाटा मदत स्वरुपात दिल्या आहेत.

मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळं कोरोनाबाधित आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या संशयितांची, तसंच लक्षणं नसलेल्या मात्र कोरोनाची बाधा झालेल्यांसाठी मुंबईत ठिकठिकाणी अलगीकरण आणि विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. कोरोनाबाधित, संशयितांची वाढती संख्या लक्षात घेऊन या केंद्रांमधील खाटांची क्षमता १ लाख करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. इतक्या मोठ्या संख्येनं लोखंडी खाटा तात्काळ उपलब्ध होणं शक्य नसून, त्यासाठी येणारा खर्चही मोठा आहे.

या खाटा पूर्णपणे घडी करून ठेवता येतात. खाटेसाठी पुठ्ठ्याचे साचे बनविण्यात आले असून ते एकमेकांमध्ये अडकविल्यानंतर खाट तयार करता येते. अवघ्या काही मिनिटांमध्ये ही खाट तयार होते. लोखंडी खाटेच्या तुलनेत पुठ्ठ्याच्या खाटेची किंमतही कमी आहे. पुठ्ठ्यावर रासानिक द्रव्य लावण्यात आलं आहे. त्यामुळे पाण्यापासून पुठ्ठय़ाचे संरक्षण होतं. परिणामी पाण्यामुळे ही खाट ओली होण्याचा धोका नसल्ययाचं समजतं.

मुंबईतील विविध ठिकाणच्या अलगीकरण, विलगीकरण कक्षामध्ये पुठ्ठ्याच्या तब्बल ५ हजार खाटा रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. आणखी २ हजार खाटा लवकरच उपलब्ध करण्यात येणार आहेत. कोरोनाची साथ ओसरल्यानंतर खाटांच्या पुठ्ठ्यावर पुर्नप्रक्रिया करून कागद निर्मिती करता येऊ शकणार आहे. हेही वाचा -

भाजीपाल्यासह धान्य मार्केट सुरू

कोरोनामृतांच्या संख्येत वाढ झाल्यानं विद्युतदाहिनीत बिघाडRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा