Advertisement

भाजपाच करतेय झाडांचा खून, सभागृहनेत्यांचा आरोप


भाजपाच करतेय झाडांचा खून, सभागृहनेत्यांचा आरोप
SHARES

महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत महापालिकेच्या प्रकल्पकामांसह खासगी विकासकांच्या बांधकामांमध्ये अडसर ठरणाऱ्या झाडांना कापण्याच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. ७ प्रस्तावांमध्ये तब्बल ५५० झाडे कापण्यास आणि पुनर्रोपीत करण्यात मंजुरी देण्यात आली. हे प्रस्ताव मंजूर करताना शिवसेनेच्यावतीने काही मुद्दे उपस्थित करण्यात आले. परंतु त्याचे उत्तर न देताच भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांच्या बहुमताच्या जोरावर प्रशासनाने हे प्रस्ताव मंजूर केले. सत्ताधारी पक्षाला डावलून मंजूर केलेल्या या प्रस्तावांमुळे शिवसेना चांगलीच भडकली असून त्यांनी भाजपा झाडांचे खून करत असल्याचा आरोप केला आहे.


शिवसेनेचा तीव्र विरोध

वृक्ष प्राधिकरणाच्या सभेपुढे विविध विकास प्रकल्पांमध्ये आड येणारी झाडे कापण्यास तसेच पुनर्रोपीत करण्याचे प्रस्ताव आले होते. यावेळी कापण्यात येणाऱ्या तसेच पुनर्रोपीत करण्यात येणाऱ्या झाडांचे आरोग्य आणि भोगौलिक परिस्थिती याची माहिती देण्याची मागणी आपण केली होती, असे सभागृहनेते यशवंत जाधव यांनी सांगितले. उद्यान विद्या विषयक तज्ज्ञ तसेच जागेचा मालक यांची एनओसी आहे का? त्यांच्याकडून कोणत्या प्रकारचे प्रतिज्ञापत्रक घेतले का? अशी विचारणा आपण केल्याचे यशवंत जाधव सांगितले. परंतु आपल्या प्रश्नांची उत्तरे न देताच भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांच्या बहुमताच्या जोरावर ५५० झाडांचे ७ प्रस्ताव चुकीच्या पद्धतीने मंजूर केले असून याला आपला तीव्र विरोध असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.


पर्यावरणाच्या ऱ्हासाला जबाबदार

जी झाडे कापली जाणार आहे, त्याबाबत योग्य माहिती समोर यायला हवी.  जे प्रस्ताव १९ महिन्यांपासून मंजुरीसाठी प्रलंबित आहेत, त्याची आताच का निकड आहे?असा सवाल करत एक प्रकारे अशाप्रकारे मंजुरी देऊन भाजपा झाडांचा खून करत आहे. त्यामुळे या पर्यावरणाच ऱ्हासाला जर कोणी जबाबदार असेल, तर भाजपा आणि प्रशासन असल्याचा आरोप जाधव यांनी केला.


...तर जाधव यांची मंजुरी घ्या

वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत झाडे कापण्या व पुनर्रोपीत करण्यास मंजुरी दिली, त्यात २ नालेसफाईच्या कामांचे, १ मलवाहिन्यांच्या सेप्टीक टँक, ३ एचपीसीएल स्टोरेजच्या प्रस्तावांचा सामावेश आहे. एक खासगी विकासकाचा प्रस्ताव होता, त्याची पाहणी लावली आहे. ज्या कामांना स्थायी समितीने मंजुरी दिली आहे, अशा विकासकामांना गती मिळावी म्हणून ते मंजूर केले. यापैकी एका प्रस्तावावर तर माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांची स्वाक्षरी आहे. 

त्यामुळे यापुढे विकास कामांचे प्रस्ताव स्थायी समितीपुढे न आणता यशवंत जाधव यांच्याकडेच नेऊन मंजुर करावे असा टोला भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी शिवसेनेला मारला आहे. शिवसेनेचा मेट्रोला विरोध मान्य आहे. परंतु त्यांनीच स्थायी समितीत मंजूर केलेल्या कामांना सभागृहनेते विरोध करत असतील, तर ते राजकीय सुडबुद्धीने  नव्हे, तर अंतर्गत हेव्यादाव्यांमुळे करत असतील, असा चिमटा कोटक यांनी काढला.


हेही वाचा

मुंबईच्या रस्त्यांवर परदेशी नकोत, भारतीय झाडे लावा़ - सभागृहनेते

महापालिका म्हणते, आता तुम्हीच लावा झाडे!

‘एल अँड टी’साठी महापालिका आयुक्तांची वकिली!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा