Advertisement

उद्यान, मैदानांमध्ये अॅक्युप्रेशर जॉगिंग ट्रॅकची मागणी


उद्यान, मैदानांमध्ये अॅक्युप्रेशर जॉगिंग ट्रॅकची मागणी
SHARES

मुंबईतील अनेक मैदान, उद्यानांचा विकास केल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना चालता यावे यासाठी स्वतंत्र जॉगिंग ट्रॅक बनवण्यात आला आहे.

मात्र, आता जॉगिंग ट्रॅकवर टोकदार आणि चुंबकीय वापराच्या अॅक्युप्रेशर शिट्स बसवून अॅक्युप्रेशर जॉगिंग ट्रॅक बनवण्याची मागणी होत आहे. या अॅक्युप्रेशर जॉगिंग ट्रॅकवर चालल्यामुळे जॉगिंगला येणाऱ्या नागरिकांचे रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होऊन नागरिकांचे आरोग्य उत्तम राहणार असल्यामुळे उद्यानांमध्ये अशा प्रकारच्या जॉगिंग ट्रॅकची मागणी केली जात आहे.


'सार्वजनिक उद्यानांत या सुविधा पुरवा'

महापालिकेची सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी चालण्यासाठी असलेला मार्ग, टोकदार पृष्ठभागामध्ये मॅग्नेटच्या वापरासह तयार करण्यात आलेल्या चौकोनी अथवा आयताकृती आकाराच्या फायबर किंवा प्लॅस्टिकच्या पायघड्या टाकून आच्छादित करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका समृद्धी काते यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.


...म्हणून अॅक्युप्रेशर जॉगिंगची मागणी

मुंबईच्या वेगवान आणि दैनंदिन धकाधकीच्या जीवनामध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्य संतुलित आणि निरोगी राखणे हे प्रत्येकाला कठीण होत आहे. वेळी अवेळी आहार घेणे, अतिप्रमाणात जंक फुडचे सेवन करणे, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव, यामुळे शरीरावर याचा विपरीत परिणाम होतो. आजकाल तारुण्यातच उच्च रक्तदाब, मधुमेह, हदयरोग, कोलेस्ट्रॉल, थायरॉईड ग्रंथीमधील बिघाड इत्यादी वृद्धावस्थेत होणारे गंभीर आजार होत असल्याचे दिसून येत आहे, ही बाब चिंताजनक असल्याची चिंता समृद्धी काते यांनी व्यक्त केली आहे.

चीन आणि जपानसारख्या देशांमध्ये वेदना आणि रोगमुक्त होण्यासाठी अन्य औषधांऐवजी ‘अॅक्युप्रेशर’ या उपचारपद्धतीचा वापर जास्तीत जास्त केला जातो. त्यामुळे याचा अवलंब मुंबईतील उद्यानांमध्येही केला जावा, असे काते यांनी या ठरावाच्या सूचनेत म्हटले आहे.



हेही वाचा - 

महापालिकाही उभारणार आयुर्वेदिक निसर्ग उद्यान

मालाडमध्ये विकासकाच्या फायद्यासाठी उद्यानातून रस्ता?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा