मिरा-भाईंदर महापालिकेने शहरातील व्यापाऱ्यांना दिलासा देत साेमवार १७ आॅगस्ट २०२० पासून दुकाने सातही दिवस सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. कोराेना विषाणूचा प्रादर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत लाॅकडाऊनच्या नियमांतर्गत शहरातील दुकाने सम-विषम पद्धतीने सुरू ठेवण्याची मुभा होती. परंतु आता व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार सम-विषमची अट काढून टाकण्यात आली आहे.
गेल्याच आठवड्यात म्हणजे ६ आॅगस्टपासून शहरातील उपहारगृह आणि अथितीगृह एकूण क्षमतेच्या ३३ टक्के क्षमतेने सुरू करण्यास मिरा-भाईंदर महापालिका प्रशासनाने परवानगी दिली होती.
मागील ४ महिन्यांपासून हाॅटेल आणि उपहारगृह बंद असल्याने हा व्यवसाय चालवणारे व्यावसायिक आणि या उद्याेगावर अवलंबून असणारे कर्मचारी मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. त्यातच महाराष्ट्र सरकारने मिशन बिगीन अगेनच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करताना हाॅटेल व्यवसाय काही अटी-शर्थींच्या सुरू करण्यास परवानगी दिल्यापासून मिरा-भाईंदर शहरातील हाॅटेल व्यावसायिक देखील स्थानिक प्रशासनाकडून कधी परवानगी मिळते, या प्रतिक्षेत होते.
हेही वाचा- गुड न्यूज! मिरा-भाईंदरमध्ये हाॅटेल उघडण्यास परवानगी
All shops are allowed to remain opened from 17.08.2020.
— MiraRoadNews 🆘🇮🇳 BHARAT (@MiraRoadNews1) August 15, 2020
MBMC order copy as follows. pic.twitter.com/Ahm2dyjJJk
दुकानदारांची ही मागणी लक्षात घेऊन मिरा-भाईंदर महापालिकेने परिपत्रक जारी केलं. या परिपत्रकानुसार मिरा-भाईंदर शहरातील माॅल्स, मार्केट काॅम्प्लेक्स, जीम व स्विमिंग पूल वगळता अन्य सर्व दुकाने नियमितपणे सोमवार १७ आॅगस्ट २०२० पासून सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
हेही वाचा- मिरा-भाईंदरमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी ४९ दिवसांवर