Advertisement

सीएसएमटी इमारतीच्या सर्वेक्षणासाठी 'या' तंत्रज्ञानाचा वापर

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुख्य इमारत आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक इमारत या दोन्हींचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे.

सीएसएमटी इमारतीच्या सर्वेक्षणासाठी 'या' तंत्रज्ञानाचा वापर
SHARES

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुख्य इमारत आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक इमारत या दोन्हींचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्सिट्यूट, रुरकीचं (सीबीआरआय) विशेष पथक मुंबईत दाखल झालं आहे. या पथकाकडून सीएसएमटी इमारतीचं स्ट्रक्टरल ऑडिट करण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे. त्यासाठी जीपीआर या भू-रडार तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.


ऐतिहासिक इमारत

सीएसएमटी या ऐतिहासिक इमारतीच्या जमिनीखाली असलेल्या सांडपाण्याच्या वाहिन्यांसह अन्य वाहिन्या सुस्थितीत आहेत की नाही हे तपासण्यासाठी ग्राऊंड पेनेट्रेटिंग रडार (जीपीआर) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. सीएसएमटी मुख्यालयातील इमारतीच्या गार्डन परिसरात नुकतीच या तंत्रज्ञानानं पाहणी करण्यात आली. संपूर्ण सीएसएमटी इमारत आणि परिसरातील इमारतीची तपासणी झाल्यानंतर पाहणीचा सविस्तर अहवाल मध्य रेल्वेकडे सूपूर्द करण्यात येणार आहे.


तज्ञ संस्थांचं मार्गदर्शन

सीएसएमटीची मुख्य इमारत ऐतिहासिक असल्यानं त्याची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी तज्ञ संस्थांचं मार्गदर्शन घेण्यात येते. त्यानूसार बांधकाम क्षेत्रातील तज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीबीआरआय, रुरकीच्या पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. सीएसएमटी आणि परिसरातील इमारतीचं आयुर्मान आणि त्यांची सद्यस्थिती तपासण्यात येत आहे.


तात्काळ दुरुस्ती

इमारतीच्या कोणत्या भागांची तात्काळ दुरुस्ती आवश्यक आहे. त्याची देखभाल कशा पद्धतीनं करता येईल, यासाठी सीबीआरआय पथकाला पाचारण करण्यात आलं आहे. सीबीआरआयच्या संपूर्ण पाहणीनंतर त्यांनी सुचविलेल्या मार्गानुसार इमारतीची देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे.



हेही वाचा -

रेल्वे हेल्पलाइनवर प्रवाशांच्या तक्रारींचा पाऊस

मुंबई ते बदलापूर प्रवास होणार जलद



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा