Advertisement

ठाण्यातल्या 'या' भागामध्ये १ ऑक्टोबरला पाणी पुरवठा खंडित

ठाण्यात १ ऑक्टोबर रोजी पाणीपुरवठा १२ तास बंद राहणार असल्याचं ठाणे महानगरपालिकेनं म्हटलं आहे.

ठाण्यातल्या 'या' भागामध्ये १ ऑक्टोबरला पाणी पुरवठा खंडित
SHARES

ठाण्यात १ ऑक्टोबर रोजी पाणीपुरवठा १२ तास बंद राहणार असल्याचं ठाणे महानगरपालिकेनं म्हटलं आहे. नौपाडा-कोपरी भागातील दुरुस्ती तसंच नुतनीकरणाची कामं करणार असल्यानं पाणी पुरवठा खंडित करण्यात येणार आहे, असं स्पष्टीकरण ठाणे महानगरपालिकेकडून देण्यात आलं आहे.

ठाणे महानगरपालिकेनं दिलेल्या आदेशानुसार, १ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता ते रात्री ९ या दरम्यान पाणी पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. कन्हयानगर जलकुंभ, धोबीघाट जलकुंभ (कोळीवाड्यासह)च्या आसपासच्या भागात १२ तास पाणीपुरवठा बंद असेल.

सुदर्शन कॉलनी, साईनगरी, नातू कॉलनी, सावरकर नगर, वाल्मीकिपाडा सोसायटी, कुंभारवाडा, गुरुदेव सोसायटी, कृष्णानगर, स्वामी समर्थ मठ, आनंदनगर, गांधीनगर, सिद्धिविनायक नगर, सिद्धार्थ नगर, कोपरी व्हिलेज, जगदाले वाडी, पै गल्ली यांचा देखील यात समावेश आहे.

टीएमसीनं स्पष्ट केलं की, कोपरीतील उपरोक्त कन्हैयानगर जलकुंभ आणि धोबीघाट जलकुंभ इथं क्रॉस कनेक्शनची कामे केली जात आहेत. अधिकाऱ्यांनी असंही म्हटलं आहे की, काशी आई मंदिराजवळ पाण्याची पाइपलाइन गळती झाली असून त्याची दुरुस्तीही केली जाईल.हेही वाचा

कोव्हीशिल्ड लशीच्या चाचणीसाठी मुंबईतून ४३ स्वयंसेवकांची निवड

मीरा भाईंदरमध्ये १० पर्यंत दुकानं खुली ठेवण्याची मागणी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय