Advertisement

MUMBAI METRO : मेट्रो 7 आणि 2A सुरू होण्यास विलंब, 'या' वर्षाचा मुहूर्त

ऑक्टोबर २०२१ पर्यंत या फेजचं काम पूर्ण होणं अपेक्षित होतं. पण याला विलंब झाला आहे.

MUMBAI METRO : मेट्रो 7 आणि 2A सुरू होण्यास विलंब, 'या' वर्षाचा मुहूर्त
SHARES

शहराला अधिक वेगवान बनवणाऱ्या मेट्रो ७ आणि 2A च्या पहिल्या फेजची सुरुवात पुढील वर्षी म्हणजे जानेवारी २०२२ पासून होणार आहे. त्या आधी ऑक्टोबर २०२१ पर्यंत या फेजचं काम पूर्ण होणं अपेक्षित होतं. यात बदल होऊन आता पुढील वर्षाचा मुहूर्त साधण्यात येतोय.

मेट्रो 2A हा मार्ग १७.५ किमीचा आहे तर मेट्रो ७ हा मार्ग १८.६ किमीची आहे. या लाईनचे जवळपास ८० टक्के काम पूर्ण झालं असल्याचं एमएमआरडीएनं सांगितलं आहे.

पुढच्या आठवड्यापासून आरडीएसओ या लखनऊच्या कंपनीकडून मेट्रो लाईनच्या कामाचे तांत्रिक परिक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून ऑक्टोबरपासून याचे परिक्षण करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ३१ मे रोजी मेट्रो लाईन ७च्या आरे ते दहिसर या मार्गावरील चाचणीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. त्यावेळी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत पहिला टप्पा सुरु होईल असं सांगितलं गेलं होतं. पण आता त्यात बदल करण्यात आला आहे.

मुंबईत २०१४ मध्ये पहिली मेट्रो सुरू झाली होती. त्यानंतर लगेचच मेट्रो 2A आणि मेट्रो ७ कडे वाटचाल सुरू झाली. दोन्ही मेट्रो मार्गावर दररोज एकूण १२ लाख प्रवासी प्रवास करू शकतील असा एमएमआरडीएचा अंदाज आहे. या मेट्रोमुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक २५ टक्क्यानं कमी होईल. या मेट्रोला चालकाची गरज नाही, मात्र सुरुवातीला काही दिवस चालक असेल असंही सांगितलं जातंय.



हेही वाचा

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी टोल माफ

कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव विशेष रेल्वे आणि एसटी बस फुल

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा