Advertisement

शिवस्मारकाच्या कामाला २४ आॅक्टोबरचा मुहूर्त; खर्च ६४३ कोटींनी वाढला

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक राज्य सरकार उभारणार अाहे. या स्मारकांतर्गत महाराजांचा २१२ मीटरचा देशातील आतापर्यंतचा सर्वात उंच असा पुतळा उभारण्यात येणार आहे.

शिवस्मारकाच्या कामाला २४ आॅक्टोबरचा मुहूर्त; खर्च ६४३ कोटींनी वाढला
SHARES

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला २४ आॅक्टोबरपासून सुरूवात होणार असल्याची माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी सोमवारी दिली आहे. मात्र, त्याचवेळी स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यासाठी सहा महिने विलंब झाला असून त्यामुळे खर्च तब्बल ६४३ कोटी रुपयांनी वाढल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.


१६.८६ हेक्टर जागेवर

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक राज्य सरकार उभारणार अाहे. या स्मारकांतर्गत महाराजांचा २१२ मीटरचा देशातील आतापर्यंतचा सर्वात उंच असा पुतळा उभारण्यात येणार आहे. १६.८६ हेक्टर जागेवर समुद्रात भराव टाकून हे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाचा अंदाजीत खर्च साडे तीन हजार कोटी रुपये असून आता या खर्चात ६४३ कोटींनी वाढ झाली आहे.


३ वर्षांत स्मारक

या प्रकल्पाचं कंत्राट सार्वजनिक बांधकाम विभागानं एल अॅण्ड टी कंपनीला दिलं आहे. त्यानुसार मार्च २०१८ मध्ये काम सुरू करण्यासंबंधीचं पत्र दिलं असून मार्च २०१८ मध्येच काम सुरू करणं अपेक्षित होतं. पण सहा महिने झाले तरी अद्याप काम सुरू झालेलं नाही. आता मात्र कामाला मुहूर्त मिळाला आहे. त्यानुसार २४ आॅक्टोबरपासून कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती मेटे यांनी दिली आहे. समुद्रात भराव टाकण्याच्या कामापासून स्मारकाच्या कामाला सुरूवात होणार आहे. काम पूर्ण होण्यास ३६ महिने अर्थात ३ वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे  या कामासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ आता द्यावी लागणार आहे.



हेही वाचा - 

दादर फूल मार्केटमधील हत्येप्रकरणी तिघांना दिल्लीतून अटक

लालबाग राजा मंडळाच्या मुजोरीला चाप; सरकारी नियंत्रण येणार




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा