महिलांसाठी भव्य ग्राहक पेठ

 Saifee Hospital
महिलांसाठी भव्य ग्राहक पेठ
महिलांसाठी भव्य ग्राहक पेठ
महिलांसाठी भव्य ग्राहक पेठ
महिलांसाठी भव्य ग्राहक पेठ
महिलांसाठी भव्य ग्राहक पेठ
See all

चर्नीरोड - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिलांनी महिलांसाठी भव्य ग्राहक पेठ आयोजित केलीय. तेजस्विनी प्रतिष्ठान गिरगाव ही संस्था दरवर्षी महिलांसाठी बचत गेट,लघु उद्योजक आणि महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना प्रोत्साहन देण्याचं काम करते. 14 ते 16 ऑक्टोबर या दरम्यान ग्राहकपेठेचे आयोजन करण्यात येणार आहे. या ग्राहकपेठेचं यंदाचं 10 वं वर्ष आहे. विविध वस्तू, दिवाळीचा फराळ ,खाद्यपदार्थ, कपडे, दागिने इत्यादींची दुकाने या ग्राहकपेठेत मांडण्यात येतात. या ग्राहकपेठेच्या अध्यक्ष माजी नगरसेवक मिनल जुटवाटकर आहे.

'गिरगांव आणि आसपासच्या खरेदी प्रेमी ग्राहकांसाठी खरेदीची पर्वणीच उपलब्ध करण्यासाठी या ग्राहक पेठेचे आयोजन करण्यात येतं. भव्य ग्राहकपेठ संर्दभात बोलत असताना ही ग्राहक पेठ घरघुती महिलांच्या कलागुणांना वाव देण्यात काम करते, या ग्राहकपेठेत 35 स्टॉल उभारण्यात येतात, या ग्राहक पेठेला उदंड प्रतिसाद मिळतो. दरवर्षी सुमारे 5 हजार ग्राहक भेट देतात,' असे मिनल जुटवाटकर यांनी सांगितले.

Loading Comments