Advertisement

अमित दाणीची मुंबईच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती


अमित दाणीची मुंबईच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती
SHARES

मुंबईच्या मुख्य प्रशिक्षकपदी विनायक सामंत याची निवड झाल्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) त्याच्या दिमतीला अमित दाणी याची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून निवड केली अाहे. मुंबईचा माजी अष्टपैलू खेळाडू असलेला अमित दाणी अाता विनायक सामंतसह मुंबई रणजी संघाला मार्गदर्शन करणार अाहे. अमित दाणीने मुंबई अाणि गोवा संघाचे प्रतिनिधित्व करताना १८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४१ विकेट्स अाणि ६६४ धावा फटकावल्या अाहेत.


दाणीची प्रशिक्षकपदाची कारकीर्द

प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर अमित दाणी प्रशिक्षणाकडे वळला. त्याने २०१४-१५ मोसमात मुंबई संघाचा क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून काम पाहिले अाहे. त्यानंतरच्या पुढच्या दोन मोसमांमध्ये तो मुंबईच्या २३ वर्षांखालील संघाचा गोलंदाजी अाणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून काम पाहत होता. दाणी अाणि सामंत यांनी मुंबईच्या २३ वर्षांखालील संघाला २०१५-१६ मध्ये सी. के. नायडू ट्राॅफी जिंकून दिली होती.


संदेश कवळे U-16 प्रशिक्षक

विनायक माने यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या १६ वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी अाता संदेश कवळे यांची निवड करण्यात अाली अाहे. संदेश कवळे हे मुंबईच्या १४ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक होते, त्यांना अाता बढती देण्यात अाली अाहे, असं एमसीएमधील सूत्रांनी सांगितलं.


हेही वाचा -

विनायक सामंत बनला मुंबईचा प्रशिक्षक!

मुंबईत जन्मलेला अजाझ पटेल न्यूझीलंडच्या कसोटी संघात

'अन् विराट कोहलीनं मला ब्लॅकबेरी फोन गिफ्ट दिला'



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा