Advertisement

जबरदस्त! कसोटी पदार्पणातच पृथ्वी शॉचं शतक

देशांतर्गत क्रिकेट सामन्यात आपल्या आक्रमक खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या पृथ्वी शॉने भारत विरुद्ध वेस्ट इंडिजदरम्यान सुरू असलेल्या कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावलं आहे.

जबरदस्त! कसोटी पदार्पणातच पृथ्वी शॉचं शतक
SHARES

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज या पहिल्या कसोटी सामन्यात मुंबईकर फलंदाज पृथ्वी शॉनं शानदार शतक ठोकलं आहे. कसोटी सामन्यात पदार्पणातच आक्रमक खेळी करत भारतीय संघातील आपली निवड योग्य असल्याचं त्यानं दाखवून दिलं आहे.

देशांतर्गत क्रिकेट सामन्यात आपल्या आक्रमक खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या पृथ्वी शॉने भारत विरुद्ध वेस्ट इंडिजदरम्यान राजकोट इथं सुरू असलेल्या कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावलं आहे. महत्त्वाचं म्हणजे पदार्पणातचं त्याने ३ विक्रमही रचले आहेत. 


९९ चेंडूत १०१ धावा

पृथ्वी शॉने ५६ चेंडूत ९ चौकारांच्या सहाय्याने दमदार अर्धशतक ठोकलं. त्यानंतर संयमी खेळी करत १५ चौकारांच्या सहाय्याने ९९चेंडूत १०१ धावा ठोकल्या. पदार्पणाच्या सामन्यात अशी कामगिरी करणारा पृथ्वी शॉ भारताचा १५ वा खेळाडू ठरला. या आधी रोहित शर्माने ६ नोव्हेंबर २०१३ रोजी पदापर्पणात शतक केलं होतं. योगायोग म्हणजे रोहितने हा पराक्रम वेस्ट इंडिजविरुद्ध केला होता. त्यावेळी त्याने १७७ धावा केल्या होत्या. 


डाव सावरत शतक पूर्ण

पदार्पणाच्या सामन्यात अशी दमदार कामगिरी करणारा पृथ्वी शॉ हा भारताचा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. पृथ्वीचं वय सध्या १८ वर्ष ३२९ एवढं असून एवढ्या कमी वयातच त्यानं हा विक्रम रचला आहे. तसंच, लोकेश राहुल माघारी परतल्यावर पृथ्वी शॉनं चेतेश्वर पुजारा याच्या साथीने संघाचा डाव सावरत आपलं शतक पूर्ण केलं.



हेही वाचा-

पृथ्वीला मराठीतून 'विराट' मंत्र

'बीसीसीआय' देणार माहिती अधिकार निर्णयाला आव्हान



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा