Advertisement

IPL 2020: मुंबईचा पंजाबवर दणदणीत विजय

आयपीएल (IPL २०२०)च्या पंजाब (Kings XI Punjab)विरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई (Mumbai Indians)चा ४८ रननी दणदणीत विजय झाला आहे.

IPL 2020: मुंबईचा पंजाबवर दणदणीत विजय
SHARES

आयपीएल (IPL २०२०)च्या पंजाब (Kings XI Punjab)विरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)चा ४८ रननी दणदणीत विजय झाला आहे. मुंबईनं ठेवलेल्या १९२ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला १४३/८ पर्यंतच मजल मारता आली.

पंजाबकडून निकोलास पूरननं २७ बॉलमध्ये सर्वाधिक ४४ रन केले. तर मुंबईकडून बुमराह, राहुल चहर आणि पॅटिन्सनला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. कृणाल पांड्या आणि ट्रेन्ट बोल्टला प्रत्येकी १ विकेट मिळवण्यात यश आलं.

बॅटिंग करताना मुंबईनं २० ओव्हरमध्ये १९१ रनपर्यंत मजल मारली. या मॅचमध्ये पंजाबनं टॉस जिंकून मुंबईला पहिलं बॅटिंगसाठी बोलावलं. पण मुंबईची सुरुवात अत्यंत खराब झाली. पण हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्डनं तुफान फटकेबाजी केली. या दोघांनी शेवटच्या ६ ओव्हरमध्ये १०४ रन केले.

पोलार्डनं २० बॉलमध्ये ४७  आणि हार्दिक पांड्यानं ११  बॉलमध्ये ३३ रन केले. कर्णधार रोहित शर्मानं ४५ बॉलमध्ये ७० रनची खेळी केली. पंजाबकडून कॉट्रेल, शमी आणि गौतमला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. या विजयासोबतच मुंबई इंडियन्स पॉईंट्स टेबलमध्येही अव्वल क्रमांकावर पोहोचली आहे. आतापर्यंत खेळलेल्या ४ मॅचपैकी २ मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला.हेही वाचा

IPL 2020 : मुंबई इंडियन्सविरोधात अखेर सुपर ओव्हरमध्ये बंगळुरूनं मारली बाजी

IPL 2020 : विराट कोहलीला १२ लाखांचा दंड!

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा