गोवंडीत मोबाइलवर गेम खेळू न दिल्याने १२ वर्षीय मुलाने केली आत्महत्या

आईने त्याला वारंवार मोबाइलवर गेम न खेळण्याबाबत बजावले होते. मात्र तरीही तो कायम मोबाइलमध्ये डोकं घालून बसायचा.

गोवंडीत मोबाइलवर गेम खेळू न दिल्याने १२ वर्षीय मुलाने केली आत्महत्या
SHARES

सध्याच्या पिढीला मोबाइलचे फार आकर्षण, मात्र इंटरनेट किंवा अन्य माध्यमातून मोबाइल (Mobile ) संवाद साधण्यासाठी जितका उपयुक्त ठरत आहे. तितकाच सध्याच्या पिढीसाठी घातक देखील, मोबाइलवर गेम खेळण्यास आईने मज्जाव केल्याने एका १२ वर्षीय मुलाने गळफास लावून आत्महत्याकेल्याची घटना रविवारी उशिरा उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केलेली आहे.

हेही वाचाः- मुंबई कोरोनाचे ९९५ नवे रुग्ण, दिवसभरात ६५ जणांचा मृत्यू

गोवंडी (Govandi)च्या शिवाजीनगर परिसरा राहणाऱ्या या १२ वर्षीय मुलाला सतत मोबाइलवर गेम खेळण्याची सवय होती. त्याच्या या सवयीमुळे त्याच्या आईने त्याला वारंवार मोबाइलवर गेम न खेळण्याबाबत बजावले होते. मात्र तरीही तो कायम मोबाइलमध्ये डोकं घालून बसायचा. रविवारी देखील आईने वारंवार हाकामारून देखील तो अल्पवयीन मुलगा मोबाइलमध्ये डोकं घालून गेम खेळण्यात मग्न होता. त्यावरून राग अनावर झालेल्या आईने त्याच्या हातातील मोबाइल हिसवून घेतला. या घटनेमुळे मुलगा ही संतापला. रागाच्या भरात तो घराच्या पोटमाळ्यावर गेला. त्या ठिकाणी त्याने गळफास लावून आत्महत्या (Suicide) केली.

हेही वाचाः- मुंबई महापालिकेला दुसरा धक्का, आरोग्य समितीच्या अध्यक्षांनाच कोरोनाची लागण

पून्हा एका तासाने आई मुलाला बोलवण्यासाठी घराच्या पोटमाळ्यावर आली. त्यावेळी गळफास घेतलेल्या मुलाला पाहून तिच्या पायाखालची जमिनच सरकली. शेजारच्यांच्या मदतीने तिने मुलाला तातडीने घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात  (Rajawadi Hospital)नेले. तेथे डाॅक्टरांनी मुलाला तपासून मृत घोषीत केले. शवविच्छेदनानंतर रुग्णालयातून मृतदेह हा मुलाच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला. या प्रकरणी शिवाजी नगर (Shivaji Nagar ) पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा