१९९३ बॉम्बस्फोट : आरोपींना शिक्षा ७ सप्टेंबरला


१९९३ बॉम्बस्फोट : आरोपींना शिक्षा ७ सप्टेंबरला
SHARES

विशेष टाडा न्यायालय १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींना ७ सप्टेंबरला शिक्षा सुनावणार आहे. आरोपींमध्ये गँगस्टर अबु सालेमसहित पाच जणांचा समावेश आहे.

या खटल्यात तब्बल २४ वर्षांनंतर म्हणजेच १६ जून रोजी न्यायालयाने सहा जणांना दोषी ठरवले होते. यांत मुस्तफा डोसा, अबु सालेम, करीमुल्ल खान, फिरोज अब्दुल राशीद खान, रियाज सिद्दीकी आणि ताहीर मर्चंट यांचा समावेश होता. यापैकी मुस्तफा डोसा याचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. तर सातवा आरोपी अब्दुल कय्याम याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

जूनमध्ये झालेल्या सुनावणीत सहाही आरोपींना कायद्यांतर्गत जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्याची मागणी सरकारी पक्षाच्या वकिलांनी केली होती. त्यावर प्रतिवाद करताना विरोधी पक्षाचे वकील सुदीप पासबोला यांनी आरोपींच्या शिक्षेसंदर्भात युक्तिवाद झाल्यानंतरच न्यायालयाने शिक्षेची सुनावणी करावी, अशी मागणी केली होती.

त्यानुसार आरोपींच्या शिक्षेवर युक्तिवाद पूर्ण झाला असून आता सर्वांना न्यायालय आरोपींना काय शिक्षा देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



हे देखील वाचा -

बॉम्बस्फोटातील दोषींना कठोर शिक्षा करा!

असा मिळाला 257 जीवांना न्याय...



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा