कुर्ल्यातील नाल्यात पडून तरूणाचा मृत्यू


कुर्ल्यातील नाल्यात पडून तरूणाचा मृत्यू
SHARES

चेंबूरमधील नाल्यात पडून ३ वर्षीय एहसान तंबोळी आणि कळव्यातील सार्वजनिक शौचालयाच्या टाकीत पडून कुणाल बागूल या लहानग्यांचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आणखी एका तरुणाचा शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास कुर्ल्यातील नाल्यात पडून मृत्यू झाला.


कधी घडली घटना?

मुंबईतील इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील कुर्ला सिग्नलजवळ रात्री ११ वाजता २५ वर्षांचा तरुण नाल्यात पडला. रात्रीच्या अंधारात नाला न दिसल्यामुळे तरूण नाल्यात पडल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. त्यावेळी उपस्थितांनी या तरुणाला नाल्यातून बाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं समजत आहे.मॅनहोल्सला झाकण नाही

या परिसरातील स्थानिकांनी मॅनहोल्सला झाकण नसल्याची तक्रार केली होती. मात्र या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.


चिमुकल्याचा मृत्यू

चेंबूरच्या चित्ता कॅम्प येथील नाल्यात पडून ३ वर्षीय एहसान परवेझ तंबोळी याचा मृत्यू झाला होता. पावसात भिजायच्या निमित्ताने एहसान घरातून बाहेर पडला. मात्र, पावसात भिजत असताना पाय घसरून घरापुढील नाल्यात पडला.


पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू

तर, कळवा येथील महात्मा फुले परिसरातील सार्वजनिक शौचालयाच्या वापरासाठी असलेल्या टाकीत पडून कुणाल बागुल या ९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. शौचालयाच्या टाकीतून पाणी काढत असताना तोल गोल्याने कुणालचा टाकीत पडून मृत्यू झाला.हेही वाचा-

कार्ड क्लोनिंगप्रकरणी आणखी एका सराईताला अटक

'ते' परदेशी नागरिकांचं डेबिट, क्रेडिट कार्ड चोरायचे, पोलिसांनी केलं गजाअाडRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा