IPL वर सट्टा मुंबईतून ५ बुकींना अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

पाच जणांकडून पोलिसांनी ९ मोबाइल आणि ४४ हजारांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे.

IPL वर सट्टा मुंबईतून ५ बुकींना अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
SHARES

देशावर ओढावलेल्या कोरोना संक्रमणाचा फटका यंदा IPL लाही सोसावा लागला. त्यामुळेच यंदाची IPL यूएइमध्ये आयोजित करण्यात आली. कोरोना संक्रमणाच्या भितीने प्रेक्षकांच्या शिवाय IPL होत असल्याने यंदा स्पर्धे दरम्यान मोठी सट्टेबाजारी होण्याची शक्यता असताना, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाच जणांना IPL वर सट्टा खेळताना रंगेहाथ अटक केली आहे.  या पाच जणांकडून पोलिसांनी ९ मोबाइल आणि ४४ हजारांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे.

हेही वाचाः- तोपर्यंत महाराष्ट्रात एकही महाविद्यालय सुरू करणार नाही- उदय सामंत

दुबईत गुरूवारी खेळवण्यात आलेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि किंग्ज इलेव्हन पंजाब सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा खेळवला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी भायखळाच्या टिंबर मार्केट, दारूखाना, आर अँण्ड स्टिल अँण्ड आलाँयस गाळा येथे छापा टाकला. त्यावेळी पोलिसांना वसिम वलयानी, मोह. हानिफ हशम सोराटिया, शोएब झीयाउल हक्क अन्सारी, समीर पवार या पाच बुकींना सट्टा लावताना रंगेहाथ अटक केली. हे बुकी मुंबईत बसून युएइमध्ये होणाऱ्या आयपीएलवर सट्टा लावत होते. या सट्टा लावणाऱ्या पाच मुलांसह क्राइम ब्रॅंचला एका डायरी सापडली आहे. या डायरीमध्ये सट्टेबाजी करणाऱ्या इतर बुकींची नावं आणि त्याचं डिटेल्स मिळाले आहे. त्यामुळे लवकरच क्राइम ब्रॅंचकडून मोठी कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. सध्या ताब्यात घेतलेल्या पाच तरुणांची कसून चौकशी केली जात आहे. यांच्या मार्फत मुंबईत सट्टेबाजी करणाऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते.

हेही वाचाः- बेस्ट समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही शिवसेनेची बाजी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्सचा संघ बुकींचा आवडता आहे. मुंबई संघावर ४.९० रुपये इतका भाव लावण्यात आला आहे. मुंबई मागोमाग हैदराबादच्या संघाला बुकींकडून पसंती दिली जात आहे. ही स्पर्धा सुरू होण्याआधीच गुरुग्राम पोलिसांनी त्यांची इंटेलिजंट विंग, क्राईम ब्रांचचा एक चमू आणि सर्व जिल्ह्यांतील स्टेशन ऑफिसर यांना सट्टेबाजांवर नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. एकीकडे सट्टेबाजाराला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असताना बुकींनी मात्र आपल्या आवडत्या संघासाठी भावही ठरवले आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा